Gold Silver Rate Today : दिवाळी (Diwali 2022) सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच हा सण म्हणजे सोने-चांदी खरेंदीचा (Gold and Silver Price) सण म्हणूनही ओळखला जातो. या दिवसांत सराफा बाजारात गर्दी दिसून येते. दरम्यान मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होतानाच गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या भावातही घसरण होताना दिसली, मात्र आता ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या- चांदीच्या भावात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच तेजी दिसून आली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती, तर आजही सोने-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.
आजचा सोने-चांदीचा भाव
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,460 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,460 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 605 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 55,300 रुपये प्रतिकिलो होती.
महानगरातील सोन्या-चांदीचे लेटेस्ट भाव
मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,460 रुपये आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,680 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,490 तर
24 कॅरेट सोन्याचा दर 50,710 रुपये
नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,490
24 कॅरेट सोन्याचा दर 50,710 रुपये
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 45,490 आहे
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 50,710 रुपये.
चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 605 रुपये आहे.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. तर, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Share Market Opening Bell: शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी; सेन्सेक्स 550 अंकांनी वधारला