Anand Mahindra Tweet : आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अनेकदा मजेशीर व्हिडीओ (Viral Video) शेअर करत असतात. सोशल मीडियावर (Social Media) त्यांचे फॉलोअर्स मोठ्या संख्येने आहेत. त्यांचे शेअर केलेले व्हिडीओ लोकांना खूप आवडतात. यावेळी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एका एटीएमचा (Idli ATM) व्हिडीओ शेअर केला आहे. हे एटीएम खूप खास आहे. त्यातून पैसे मिळत नाहीत, पण गरमागरम इडली येते. काय आहे या व्हिडीओत?


आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल


आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओतील इडली एटीएम खास आहे, ते 24 तास सुविधा देते. व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, हे इडली एटीएम परदेशातील मॉल्स आणि विमानतळांवरही लावावे. 


 






 



इडली एटीएम मशीन
बंगळुरूमध्ये दोन मशीन (Idli ATM) बसवण्यात आल्या आहेत. शहरातील काही कार्यालये, रेल्वे स्थानके आणि विमानतळांवर अशी मशिन बसविण्याची योजना आहे. इडली बॉट्स व्यतिरिक्त डोसाबॉट्स, राईसबॉट्स आणि ज्यूसबॉट्स मशीन्स बसवण्याची योजना आखली जात आहे. देशात अनेक ठिकाणी चॉकलेट आणि स्नॅक्स व्हेंडिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. पण इडली एटीएम पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



55 सेकंदात इडली मिळवा
या एटीएममध्ये 55 सेकंदात गरमागरम इडली मिळते. ही इडलीही खूप ताजी आहे. या एटीएममध्ये ही सुविधा 24 तास 7 दिवस उपलब्ध आहे. येथे तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही इडलीचा आनंद घेऊ शकता. या ATM मधून एकदम ताज्या इडल्या मिळतात, यामध्ये ऑर्डर केल्यावर एटीएमच तुमच्यासमोर इडली बनवायला सुरुवात करतो. तुमच्या समोर इडल्या बनवतानाही बघायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला 55 सेकंदात इडली मिळते. त्याच्या पॅकेजिंगमध्ये कोणतेही प्लास्टिक वापरले जात नाही. हे पूर्णपणे इको फ्रेंडली आहे.


नेटकरी झाले आश्चर्यचकीत
लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे, लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. लोक ते खूप शेअर करत आहेत आणि त्यावर कमेंटही करत आहेत. अशाप्रकारे एटीएममधून इडली खाणे खूप रोमांचक असल्याच्या कमेंट लोक करत आहेत. दिसायला खूप चविष्ट दिसते.