Gold Silver Rate: भारतात सध्या सणांचा हंगाम सुरु झाला आहे. आता काही दिवसात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. अशा परिस्थितीत लोक सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागेल. कारण, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात सोन्याचा वायदा बाजार 60 हजार 478 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला. यानंतर, त्याच्या किंमतीत किंचीत वाढ नोंदवण्यात आली आहे . गेल्या ट्रेडिंग दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात 17 रुपयांची म्हणजेच 0.03 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या सोन्याचा दर हा 60 हजार 554 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीच्या दरातही किंचित वाढ
सोन्याव्यतिरिक्त आज चांदीचा भावही वायदा बाजारात तेजीत आहे. आज सुरुवातीच्या टप्प्यात चांदी 71 हजार 629 रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला. यानंतर, त्याच्या किंमतीत काही वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत 154 पैसे किंवा 0.02 टक्के वाढीसह ती 71 हजार 800 रुपयांवर पोहोचली आहे. सोमवारी चांदी 71 हजार 786 रुपये प्रति किलो (चांदीची किंमत आज) या पातळीवर बंद झाली होती.
आजचे देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय?
दिल्ली - 24 कॅरेट सोने 61,800 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
कोलकात्यात - 24 कॅरेट सोने 61,800 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
मुंबईत - 24 कॅरेट सोने 61,800 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
चेन्नईमध्ये - 24 कॅरेट सोने 61,690 रुपये, चांदी 77,500 रुपये प्रति किलो
लखनौमध्ये - 24 कॅरेट सोने 61,950 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
गुरुग्राममध्ये - 24 कॅरेट सोने 61,950 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
पुण्यात - 24 कॅरेट सोने 61,800 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
पाटण्यात - 24 कॅरेट सोने 61,850 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
जयपूरमध्ये - 24 कॅरेट सोने 61,950 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
नोएडामध्ये - 24 कॅरेट सोने 61,950 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
गाझियाबादमध्ये - 24 कॅरेट सोने 61,950 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ
देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी दिसून येत आहे. मेटल रिपोर्टनुसार, आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 0.05 टक्क्यांनी वाढून 1,970.50 डॉलर प्रति औंस आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीचे दर हे 0.33 टक्क्यांच्या घसरणीसह 23.58 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: