Gold Silver Rate : सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोरआली आहे. आज पुन्हा सोन्या चांदीच्या दरात घसरण झालीय. त्यामुळं सोने आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळाली आहे. बुलियन मार्केट (Bullion Market) या वेबसाइटर दिलेल्आ माहितीनुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 71790 रुपये आहे. मागच्या ट्रेंडमध्ये याच सोन्याची किंमत ही 71910 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. 


सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण! 


दरम्यान, एका बाजूला सोन्याच्या दरात घसरण होत असताना दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरात देखील घसरण झालीय. चांदीचा दर हा 90930 रुपये प्रति किलो आहे. मागील ट्रेंडमध्ये हाच चांदीचा दर हा 91390 रुपये प्रति किलो होता. आज यामध्ये चांगलीच घसरण झाल्याचे पाहयला मिळत आहे. 


महाराष्ट्रात कोणत्या शहरात सोन्याला किती दर?


शहर            22 कॅरेट सोन्याचा दर            24 कॅरेट सोन्याचा दर


मुंबई -         10 ग्रॅमसाठी 65688              10 ग्रॅमसाठी 71660
पुणे -           10 ग्रॅमसाठी 65688              10 ग्रॅमसाठी 71660     
नागपूर -       10 ग्रॅमसाठी 65688              10 ग्रॅमसाठी 71660     
नाशिक -       10 ग्रॅमसाठी 65688              10 ग्रॅमसाठी 71660   



24 कॅरेट आणि  22 कॅरेट सोन्यामध्ये नेमका फरक काय? 


दरम्यान, अनेकवेळा तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की 24 कॅरेट आणि  22 कॅरेट सोन्यामध्ये नेमका फरक काय? तर दोन्ही प्रकारच्या सोन्याता फरक आहे 24 कॅरेटचे सोने हे 99.9 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोने हे  अंदाजे 91 टक्के शुद्ध असते. तर 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9 टक्के इतर धातूंचे मिश्रण करुन दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.


सोनं चांदी खरेदी करण्याची मोठी संधी


गेल्या अनेक दिवसापासून सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हा खरेदीदारांना मोठा दिलासा आहे. वाढत्या सोन्याच्या दरामुळं सोन्याची खरेदी करावी की नको? असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत होता. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या काळात सोन्या चांदीच्या खरेदीत मोठी वाढ होत असते. मात्र, दरात वाढ होत असल्यानं नागरिक खरेदीकडे पाठ फिरवताना दिसत होते. आता मात्र, दरात घसरण होत आहे. त्यामुळं सोनं चांदी खरेदी करण्याची ग्राहकांना मोठी संधी मिळाली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


दिलासादायक! सोनं चांदी खरेदी करण्याची मोठी संधी, दरात झाली घसरण, कोणत्या शहरात किती दर?