Gold Silver Prices Today : रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील भागांना मान्यता देणार असल्याचे सांगितल्यानंतर युक्रेनच्या संकटामुळे भारतातील सोन्या-चांदीच्या किंमतीत 22 फेब्रुवारीला (मंगळवारी) वाढ झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX), सोन्याचे फ्युचर्स 0. 75 टक्क्यांनी वाढून सोन्याचा दर 50,454 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, चांदीचा दर 1.13 टक्क्यांनी वाढून 64,426 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर :


जागतिक बाजारात, सोन्याच्या किंमती जवळपास नऊ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ज्यामुळे धातूची मागणी वाढली आहे. स्पॉट सोन्याचा दर 0.2 टक्क्यांनी वाढून $1,909.54 प्रति औंस झाला आहे. जागतिक बाजारात स्पॉट सिल्व्हर 0.9 टक्क्यांनी वाढून 24.14 डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनम 0.9 टक्क्यांनी वाढून 1,083.68 डॉलर आणि पॅलेडियम 0.8 टक्क्यांनी वाढून 2,406.24 डॉलरवर पोहोचला आहे.


मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर :



तुम्ही या दरांनी फार सोप्या पद्धतीने घरबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे. यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो मेसेज येईल त्यामधून तुम्ही सोन्या-चांदीचे आजचे दर जाणू शकता. 


अशा पद्धतीने चेक करू शकता सोन्याची शुद्धता :


जर तुम्हाला सोन्याची शुद्धता चेक करायची आहे. तर यासाठी सरकारतर्फे एका अॅपची सुविधा करण्यात आली आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) चेक करू शकता. इतकेच नाही, तर या अॅपच्या माध्यमातून तुम्ही संबंधित कोणतीही तक्रारदेखील नोंदवू शकता.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha