Gold Silver Prices on 5 जानेवारी 2022: सलग तीन दिवस सोने-चांदीच्या (Gold-Silver) किंमतीत घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात 304 रूपयांची घसरण झाली. सध्या 47,853 रूपये प्रति 10 ग्रॅम हा दर सुरु आहे. तर चांदीच्या (Silver Price Today) दरात देखील घसरण झालेली दिसून आली आहे. चांदी 61,447 रूपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण :
याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोन्याचा दर 1,804 डॉलर प्रति औंस पातळीवर होता. , चांदीचा दर 23.83 डॉलर प्रति औंसवर होता. या ठिकाणी सोन्या-चांदीच्या दरात अधिक बदल झालेला दिसून आला नाही.
जाणून घ्या तज्ञांचं म्हणणं :
एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक (जिंस) तपन पटेल यांनी असे सांगितले की, ‘‘ न्यूयॉर्क स्थित जिंस एक्सचेंज कॉमेक्समध्ये सोमवारी आलेल्या घसरणीनुसार दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत घसरली.’’
सोन्याची शुद्धता तपासा :
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचासुद्धा वापर करू शकता. ‘BIS Care app’च्या माध्यमातून तुम्ही सोने खरे आहे की खोटे हे तपासू शकता. याचबरोबर तुम्ही या अॅपच्या माध्यमातून तक्रारदेखील नोंदवू शकता.
हे ही वाचा -
इंटरनेटशिवाय करता येणार डिजीटल व्यवहार, RBI ने दिली मंजुरी
Share Market opening : शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha