दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1.अनाथांची माय हरपली, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, आज दुपारी होणार अंत्यसंस्कार
नाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात सिंधुताईंवर उपचार सुरू होते. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. 'अनाथांची माय' असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
2. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक, निर्बंधांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार
3. तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्रानं दिलेला निधी महाराष्ट्र सरकारकडून खर्चच नाही, एकूण निधीच्या फक्त ०.३२ टक्के निधीच खर्च केल्याचं पीआयबीच्या आकडेवारीतून उघड
4. मुंबई, ठाणे पाठोपाठ पुण्यातील शाळाही बंद, राज्यातील इतर शाळांबाबात आज निर्णय होण्याची शक्यता
5. जगभरात डेल्टा आणि ओमायक्रॉनचा धुमाकूळ सुरु असताना कोरोनाचा नवा व्हेरियंट I-H-U उजेडात, कॅमेरुनवरुन फ्रान्समध्ये परतलेल्या १२ जणांना लागण.
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 05 जानेवारी 2022 : बुधवार
6. नाशकातल्या सावरपाड्याची पाण्यासाठी सुरु असलेली जीवघेणी कसरत संपणार, एबीपी माझाच्या बातमीनंतर पाईपलाईननं पाणी पुरवठा करण्याचे आदेश
7. बुलीबाई अॅपवरुन मुस्लिम महिलांच्या बदनामीप्रकरणात महिलेचाच हात, उत्तराखंडमधून १८ वर्षीय तरुणीला अटक, बंगळुरुमधून अटक करण्यात आलेल्या तरुणाशी ओळख असल्याचंही समोर
8. ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी असणाऱ्या उत्पन्नाच्या आठ लाख रुपयांच्या मर्यादेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, नीट मेडिकल पीजी प्रवेशाचा मार्ग सुकर होणार की नाही हे स्पष्ट होणार.
9. शार्दुल ठाकूरच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांत गुंडाळला, भारताला दिवसअखेर ५८ धावांची आघाडी, टीम इंडियाची दुसऱ्या डावात खराब सुरुवात, पुजारा-रहाणेंच्या कामगिरीकडे लक्ष
10. कसोटी क्रिकेटमधील विश्वविजेत्या न्यूझीलंडला बांगलादेशचा धक्का, बांगलादेशचा न्यूझीलंडवर पहिल्या कसोटीत आठ विकेट्सने विजय