मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलणाऱ्या सोन्या-चांदीच्या भावाने आज उसंत घेतली आहे. रविवारी मार्केट बंद होताना सोन्याच्या आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,810 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,810 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीसाठी 69,300 रुपये मोजावे लागणार आहेत.


सोन्याच्या दरात 9 जुलैला 170 रुपयांची घसरण झाली होती. त्याच्या आधी सलग आठ दिवस सोन्याच्या दरात अगदीच किरकोळ का असेना वाढ होत होती. आज सोन्याचे दर स्थिर आहेत. चांदीच्या दराचा विचार करता 7 जुलैला 600 रुपये, 8 जुलैला 1000 रुपये आणि 9 जुलैला 200 रुपयांनी चांदीच्या दरात घसरण झाली होती. तीन दिवसांच्या घसरणीनंतर 11 जुलैला पुन्हा 500 रुपयांची वाढ झाली होती. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यातील गुंतवणूक कमी
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 


गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.


महत्वाच्या बातम्या :