Gold Silver Price Today: देशात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असलेल्या सोने-चांदीच्या दरांमध्ये (Gold Silver Price) आता घसरण पाहायला मिळत आहे. मजबूत डॉलर, जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांकडून नफावसुली (Profit Booking) यामुळे आज सोने-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असून, मौल्यवान धातू खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी मानली जात आहे.

अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव, जागतिक बाजारातील अस्थिरता आणि आयात शुल्कातील वाढ याचा परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर होताना दिसत आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये 16 मे रोजी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. डॉलर इंडेक्स मजबूत झाल्याने आणि गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंचे दर 4 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत.

Gold Silver Price Today: MCX वर सोने-चांदीत घसरण

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या वायदा दरात 1.52 टक्के म्हणजेच 2,478 रुपयांची घसरण झाली. यानंतर सोन्याचा दर 1,59,500 रुपये या इंट्राडे लोपर्यंत खाली आला. तर चांदीच्या किमतीत 4.12 टक्के म्हणजे तब्बल 12,000 रुपयांची घसरण झाली असून, तिचा दर 2,79,102 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

Gold Price Today: देशातील प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर

नवी दिल्ली

24 कॅरेट : 15,805 रुपये प्रति ग्रॅम22 कॅरेट : 14,489 रुपये प्रति ग्रॅम18 कॅरेट : 11,857 रुपये प्रति ग्रॅम

मुंबई

24 कॅरेट : 15,790 रुपये प्रति ग्रॅम22 कॅरेट : 14,474 रुपये प्रति ग्रॅम

चेन्नई

24 कॅरेट : 16,107 रुपये प्रति ग्रॅम22 कॅरेट : 14,764 रुपये प्रति ग्रॅम

कोलकाता

24 कॅरेट : 15,790 रुपये प्रति ग्रॅम22 कॅरेट : 14,474 रुपये प्रति ग्रॅम

बेंगळुरू

24 कॅरेट : 15,790 रुपये प्रति ग्रॅम22 कॅरेट : 14,474 रुपये प्रति ग्रॅम

Silver Price Today: भारतातील आजचा चांदीचा दर

देशात सध्या चांदीचा दर 289.80 रुपये प्रति ग्रॅम आणि 2,89,900 रुपये प्रति किलो इतका आहे.

शहरानुसार चांदीचे दर 

दिल्ली / मुंबई

10 ग्रॅम : 2,899 रुपये100 ग्रॅम : 28,990 रुपये1 किलो : 2,89,900 रुपये

चेन्नई / हैदराबाद

10 ग्रॅम : 3,049 रुपये100 ग्रॅम : 30,490 रुपये1 किलो : 3,04,900 रुपये

Gold Price: एप्रिलमध्ये सोन्याच्या आयातीत 82 टक्के वाढ

भारतामध्ये एप्रिल महिन्यात सोन्याच्या आयातीत मोठी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, सोन्याची आयात 81.69 टक्क्यांनी वाढून 5.62 अब्ज डॉलर इतकी झाली. तर चांदीची आयात 157.16 टक्क्यांनी वाढून 41.1 कोटी डॉलर इतकी नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सोन्याचे एकूण आयात मूल्य 24 टक्क्यांनी वाढून विक्रमी 71.98 अब्ज डॉलर इतके झाले आहे. मात्र, प्रमाणाच्या दृष्टीने सोन्याची आयात 4.76 टक्क्यांनी घटून 721.03 टन इतकी राहिली. दुसरीकडे, चांदीची आयात जवळपास 150 टक्क्यांनी वाढून 12 अब्ज डॉलर झाली असून, प्रमाणाच्या दृष्टीने ती 42 टक्क्यांनी वाढून 7,334.96 टन इतकी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात जागतिक घडामोडी, डॉलरची स्थिती लक्षात घेता सोने-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा 

Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय