Gold Silver Price News: दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) विक्रमी वाढ होताना दिसत आहे. काही केल्या सोनं कमी होताना दिसत नाही. गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होतोना दिसतेय. दोन महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 11 हजार रुपयांची वाढ झालीय. याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय. अशा स्थितीमुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होताना दिसत आहे.
सोन्यासोबत चांदीच्याही दरात वाढ
गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. मागील दोन महिन्यात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झालीय. सोन्याच्या दरात तब्बल 11 हजार रुपयांची वाढ झालीय. दरम्यान, सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होताना दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, चांदीच्या दरातही दोन महिन्यांत तब्बल 16 हजार रुपयाहून अधिक वाढ झालीय.
देशात लग्नसराईचा हंगाम सुरु असतानाचा सोन्याच्या दरात वाढ
दरम्यान, भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. यामध्ये लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करतात. मात्र, सध्या दिवसेंदिस सोनं चांदी महाग होताना दिसत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करणं कठीण झालं आहे. अनेक लोक सोन्याच्या खरेदीकडं पाठ फिरवताना दिसत आहेत. दरम्यान, पुढच्या काही दिवसात अक्षय तृतीयाचा सण येणार आहे. यावेळी देखील मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत असते. त्यामुळं या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
सोन्या चांदीच्या दरात नेमकी किती झाली वाढ?
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात 24 कॅरेट सोन्याचा दर हा 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हा दर वाढून आता 73,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. म्हणजे दोन महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 11 हजार रुपयांची वाढ झालीय. तर चांदीच्या दरातही दोन महिन्यात 16,847 रुपयांची वाढ झालीय. फेब्रुवारी महिन्यात चांदी 69,653 रुपये प्रति किलो होती, मात्र, सध्या चांदीचा 86,500 रुपये प्रतिकिलो झाली आहे.
भविष्यात सोनं चांदी वाढणार का?
दरम्यान, भविष्यात सोनं चांदी वाढणार का? असा सर्वांनाच प्रश्न पडला असेल. तर याचं उत्तर होय असंच राहील, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. भविष्यात सोन्याच्या दरात आणखी वाढ होणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. सोन्या चांदीच्या वाढत्या दराला आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत आहे. इराण आणि इस्राईल युद्धामुळं जगात अनिश्चिततेचं वातावरण आहे. या स्थितीत जगभरातील गुंतवणूकदार आणि मोठ्या बँका सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. याचा परिणाम दरांवर होत आहे.
महत्वाच्या बातम्या: