State Excise Department action : सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आज पहिल्या टप्प्यातील मतदान (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांमध्ये मतदान जागृती करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता जाहीर झाल्यापासून अनेकांनी आचारसंहीतेचा भंग केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचरसंहिता लागू झाल्यापासून तब्बल 4 हजार 255 गुन्हे दाखल केले आहेत. तर आत्तापर्यंत 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.


आत्तापर्यंत 3 हजार 754 आरोपींना अटक


लोकसभा निवडणुकीत मतदारांना दारुची प्रलोभन दाखवली जातात. तसेच पार्ट्यांचं देखील मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं. त्यावर अंकुश ठेवण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठं यश आलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचरसंहिता लागू झाल्यापासून तब्बल 4 हजार 255 गुन्हे दाखल केले आहेत. तर या गुन्ह्यात 3 हजार 754 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर या सर्व कारवाई दरम्यान उत्पादन शुल्क विभागाने 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केला आहे. 


देशातील 102 मतदारसंघात पार पडणार मतदान प्रक्रिया


देशात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज होणार आहे. देशातील एकूण 102 मतदारसंघात आज मतदार आपला मतदानाचा हक्ब बजावणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातीलही काही मतारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील पूर्व विदर्भात पाच मतदारसंघात आज मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळं आज मतदार कोणाच्या पारड्यात मतांचं दान टाकणार हे 4 जूनला समजणार आहे.  


दरम्यान, आज होणाऱ्या या पहिल्या टप्प्यात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पहिल्या टप्प्यात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील विदर्भामध्ये सभा झाली होती. तसेच अनेक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. त्यामुळं प्रत्येक उमेदवाराने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील मतदार प्रक्रिया आज जरी पार पडली असली तरी, अद्याप सहा मतदानाचे टप्पे बाकी आहेत. त्यानंतर म्हणजे 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


Lok Sabha Election Phase 1: लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद