Gold Silver Price : तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी बातमी आहे. शुक्रवारी सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. 1 किलो चांदीचा दरही खाली आला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
सोन्याचा भाव
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 58 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 50,793 रुपयांवर बंद झाला. तर 1 किलो चांदीचा दरही खाली आला आहे. त्याच वेळी, गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 50,851 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. आज (शनिवारी) दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 52,570 रुपये आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
आज चांदीची किंमत किती कमी झाली?
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव घसरणीसह 62,000 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता सोन्या-चांदीचे दर
माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की हे दर तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 895566443 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.
FY22 मध्ये सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढली
विशेष म्हणजे, गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात $34.62 अब्ज होती.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर :
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 52,750 | 62,000 |
पुणे | 52,800 | 62,000 |
नाशिक | 52,800 | 62,000 |
नागपूर | 52,800 | 62,000 |
दिल्ली | 52,750 | 62,000 |
कोलकाता | 52,750 | 62,000 |
एमसीएक्सवरही सोने घसरले
फ्युचर्स मार्केटमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव 89 रुपयांनी घसरून 50,916 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, ऑगस्टमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 89 रुपये किंवा 0.17 टक्क्यांनी घसरून 50,916 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
शुक्रवारी वायदे बाजारात चांदीच्या दरातही थोडीशी घसरण झाली आणि तो 133 रुपयांनी घसरून 61,278 रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, जुलैमध्ये डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 133 रुपयांनी घसरून 61,278 रुपये प्रति किलो झाला. 14,166 लॉटसाठी व्यवहार झाला.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Share Market Opening : शेअर बाजारात विक्रीचा दबाव; सेन्सेक्सची 300 अंकांच्या घसरणीसह सुरुवात
- Crude Oil Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ; 123 डॉलर प्रति बॅरल दर
- Explainer RBI Rate Hike: महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याज दरवाढ कशी करते मदत? जाणून घ्या