Gold Silver Price Today: सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने आणि चांदीच्या वायदे व्यवहारात अजूनही वाढ होत आहे. सोन्याचे वायदे 70,000 रुपयांच्या आसपास, तर चांदीचे वायदे 84,900 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरानं उच्चांक गाठला आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ


सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती आज वाढीने सुरु झाल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर आज 339 रुपयांच्या वाढीसह 69994 रुपयांवर उघडला. तर चांदीच्या वायद बाजारात देखील आज जोरदार वाढ झाली. MCX वर आज चांदीच्या दरात 173 रुपयांची वाढ झाली असून, चांदी 83,915 रुपयांवर गेली आहे. दरम्यान, यावर्षी चांदीच्या भावाने 96,493 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या फ्युचर्सच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली. 


सोन्याचे हॉलमार्क कसे तपासायचे?


सर्व कॅरेटचा हॉलमार्क क्रमांक भिन्न असतो. उदाहरणार्थ, 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे. यामुळं त्यांच्या शुद्धतेमध्ये शंका नाही. 


सोन्यावरील कस्टम ड्युटी 6 टक्के करण्याची घोषणा


अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचाी घोषणा केली आहे. त्यामुळं सोन्याच्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. तर दुसरीकडे सोन्याचे दर कमी झाल्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला होता. दरम्यान, या निर्णयानंतर सोन्याच्या दराच चांगलीच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. सोन्यावरील कस्टम ड्युटी 6 टक्के करण्याची घोषणा केली. सध्या सोन्यावरील कस्टम ड्युटीचा प्रभावी दर 15 टक्के आहे. म्हणजेच अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी 9 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चांदीवरील कस्टम ड्युटीही 15 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आली आहे. सोने-चांदीशिवाय प्लॅटिनमवरही कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.


अर्थसंकल्पाने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा बदल घडवून आणला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्वेलर्सच्या जुन्या मागणीनंतर सोने आणि इतर काही मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव दिला. या निर्णयाचा जनतेवर दुहेरी परिणाम होत आहे. एकीकडे असे लोक आहेत जे सोने खरेदीच्या तयारीत होते, त्यांना मोठा फायदा झाला आहे. मात्र, दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली होती, त्यांचे नुकसान झाले आहे.


महत्वाच्या बातम्या:


सोनं-चांदी खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? आठवडाभरात दरात किती झाली घसरण?