Gold Silver Rate Today : सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीत तेजी पाहायला मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे सोने-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. असं असलं तरी सोने आणि चांदीच्या मागणीत मात्र घट झालेली नाही. सध्या लग्नसराईचा काळ सुरु असल्याने सोने-चांदीला मोठी मागणी आहे. आज सोन्याच्या दराने (Gold Price Today) 64 हजारांचा आकडा पार केला आहे. तर चांदीचा भाव (Silver Price Today) 80 हजारांच्या पुढे पोहोचला आहे. तुमच्या शहरात सोने-चांदीचा दर काय?


आंतरराष्ट्रीत बाजारात सोन्याला झळाळी


सोन्याच्या दरात सध्या प्रचंड वाढ होताना दिसत आहे. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीने प्रति औंस 2,100 डॉलरची पातळी ओलांडली आहे. आज आंतरराष्ट्रीच बाजारात सोनं 2,146 डॉलर प्रति औंस ही सर्वोच्च पातळी गाठली आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम भारतीय बाजारांवर दिसून येत आहे. फ्युचर्स मार्केट म्हणजेच MCX वर 24 कॅरेट सोन्याचा दर 64,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका वाढला आहे. एमसीएक्समध्ये सोन्याचा भाव 64,000 च्या पातळीवर दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.


चांदीचा दर विक्रमी 80 हजारांवर


मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 5,885 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,420 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 64,200 रुपये आहे. आज एक किलो चांदीचा दर 80,500 रुपये किलो आहे.


देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)



  • मुंबई - मुंबईत सोन्याचा भाव 440 रुपयांनी वाढला आहे. आज सोन्याचा दर 64200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Mumbai Gold Rate Today)

  • दिल्ली - दिल्लीमध्ये सोन्याचा दर 440 रुपयांनी वाढला आहे. आज दिल्लीत सोन्याचा भाव 64350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)

  • कोलकाता - आज कोलकातामध्ये सोन्याचा भाव 440 रुपयांनी वाढला आहे. सोन्याचा दर 64200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)

  • चेन्नई - आज सोन्याचा भाव 650 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आज सोन्याचा दर 65180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)


महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)



  • पुणे - 64200 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Price Today)

  • नाशिक - 64230 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Price Today)

  • नागपूर - 64200 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Price Today)

  • कोल्हापूर - 64200  रुपये प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Price Today)