Gold Rate Today In India, 27 January 2024 : आज सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीच्या विचारात असाल, तर बाजारात जाण्याआधी सोने-चांदीचा लेटेस्ट भाव जाणून घ्या. आज सोने-चांदी महागली (Gold Silver Price Hike) आहे. सोने आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचा भाव वाढला आहे. आज तुमच्या शहरातील सोने-चांदीचा भाव काय, जाणून घ्या.


सोन्याला झळाळी


सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सोन्याची किंमत 100 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढली आहे. त्याआधी शक्रवारीही सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली होती. गुडरिटर्न्स (GoodReturns) वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार, आज 27 जानेवारीला, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,050 रुपये प्रतितोळा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 47, 290 प्रतितोळा आहे.


आज चांदीचा भाव काय? (Silver Price Today) 


आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदी 500 रुपये प्रतिकिलो दराने महागली आहे. आज एक किलो चांदीचा दर 76,500 रुपये प्रति किलो आहे. शुक्रवारी चांदीचा दर 76,000 रुपये प्रतिकिलो होता. 


देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)



  • मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 100 रुपयांनी वाढला असून आज 24 कॅरेट सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)

  • दिल्ली - दिल्लीत सोनं 100 रुपयांनी महाग झालं असून आज सोन्याचा 63200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)

  • कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा दर 100 रुपयांनी वाढला असून आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)

  • चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 63550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली आहे. (Chennai Gold Rate Today)


महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra 24K Gold Rate)



  • पुणे - आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate) आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 57800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

  • नाशिक - 24 कॅरेट सोने 63080 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate) आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 57830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

  • नागपूर - 24 कॅरेट सोने 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate) आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 57800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

  • कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 57800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bank Loan : मोठी बातमी! गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज महागलं, 7 बँकांकडून MCLR मध्ये वाढ