Gold Silver Rate Today, 22 January 2024 : सध्या पौष महिना सुरु असून, पुढच्या महिन्यापासून लग्नाचे मुहूर्त आहेत. यामुळे सोने आणि चांदीला (Gold Price Today) मोठी मागणी आहे. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात वाढ झाली असली, तर मागणीही वाढताना दिसत आहे. अशातच तुम्हीही सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल, तर ही बातम तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण की वाढ, तुमच्या शहरातील आजचा भाव काय, हे जाणून घ्या. आज मात्र सोने-चांदीच्या दरात (Gold Price Today) दिलासा मिळाला आहे. आज सोन्याची किंमत (Gold Rate Today) स्थिर असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6305 रुपये प्रति ग्रॅम आहे.
सोने-चांदीचा आजचा दर काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार कायम आहेत. आज 21 जानेवारीला सोन्याच्या दरात (Gold Price Today) कोणताही बदल झालेला नाही. शनिवारी बाजार बंद होताना सोन्याच्या दरात वाढ झाली. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Price Today) 5780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Price Today) 6305 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर (18K Gold Price Today) 47,290 रुपये प्रति 10 ग्रॅम तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,050 रुपये प्रतितोळा आहे.
आज चांदीचा भाव काय? (Silver Price Today)
आज चांदीच्या दरातही कोणताही बदल झालेला नसून चांदीचा भाव स्थिर आहे. आज एक किलो चांदीचा दर 75,500 रुपये प्रति किलो आहे. मात्र, शनिवारी एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये होता. त्यानंतर रविवारी चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली आणि आज भाव स्थिर आहे.
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)
- मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
- दिल्ली - दिल्लीत सोनं 63200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. (Delhi Gold Rate Today)
- कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
- चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 63550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra 24K Gold Rate)
- पुणे - आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
- नाशिक - 24 कॅरेट सोने 63080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
- नागपूर - 24 कॅरेट सोने 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)