Gold Silver Rate Today : सध्या लग्नसराईचा काळ (Wedding Season) सुरु आहे. तुमच्यासाठी किंवा नातेवाईकांना भेटवस्तू देण्यासाठी म्हणून तुम्हीही आज सोने-चांदी (Gold Silver Price) विकत घेण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी नक्की वाचा. सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी आज सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) काही बदल झाला आहे का हे जाणून घ्या. तसेच आजचा सोने-चांदीचा भाव काय आहे, याबाबत सविस्तर माहिती वाचा.


सोने महागलं की ग्राहकांना दिलासा?


सध्याच्या लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदीदारांना आज दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोने आणि चांदीचा भाव आज स्थिर आहे. सोन्याच्या दरात शनिवारी किंचित घट झाली होती. आज मात्र सोन्याचे दर कायम आहेत. आज, 10 डिसेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 62,350 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्यााचा दर प्रति तोळा 57,150 रुपये तर, 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 46,760 रुपये आहे. 


जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात चढ-उतार


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून लग्नाच्या मोसमात सोन्याचे दर घसरले आहेत.


24 कॅरेट सोन्याची किंमत काय?


24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव (24K Pure Gold Rate Today) आज 62350 रुपये आहे. याआधी शनिवारी सोन्याच्या दरात सातत्याने काहीशी घसरण पाहायला मिळत होती. आज सोने-चांदीच्या दरात घसरण झाली नसली तरी, आज सोनं-चांदीचे दर स्थिर आहेत. डिसेंबर महिन्यात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहेत.


चांदीची किंमत काय?


आज चांदीच्या दरातही (Silver Rate Today) कोणताही बदल झालेला नाही. रविवारी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे. 


देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)



  • मुंबई - मुंबईत सोन्याचा भाव 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Mumbai Gold Rate Today)

  • दिल्ली - सोन्याचा भाव 62500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)

  • कोलकाता - सोन्याचा दर 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)

  • चेन्नई - सोन्याचा दर 62890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)


महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)



  • पुणे - 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)

  • नाशिक - 62380 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate)

  • नागपूर - 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate)

  • कोल्हापूर - 62350 रुपये  प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Gold Bond Scheme : स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी! डिसेंबर आणि फेब्रुवारीमध्ये SGB मध्ये गुंतवणूकीची संधी