Gold Rate Today नवी दिल्ली : अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं व्याज दर कपातीसंदर्भात निर्णय घेतल्यानंतर जगभरातील बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळतेय. सोने आणि चांदीच्या दरात देखील घसरण पाहायला मिळाली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं मात्र स्थानिक सराफ बाजारामध्ये दरात घसरण झाल्याचं दिसून आलं.
कमोडिटी बाजारात सोने दरात तेजी असली तरी स्थानिक सराफ बाजारात सोनं स्वस्त दरात उपलब्द होत आहे.10 ग्रॅम सोनं यावेळी 77000 रुपयांपेक्षा कमी दरात उपलब्ध होत आहे. 10 ग्रॅम सोन्याचा उच्चांकी दर 82 हजार रुपये होता, त्यापेक्षा कमी दरात सोनं मिळत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. 164 रुपये किंवा 0.22 टक्क्यांनी सोने दरात वाढ झाली. 10 ग्रॅम सोनं 75815 रुपयांवर पोहोचलं होतं. हे फेब्रुवारीच्या वायद्याचे दर आहेत. याशिवाय चांदीच्या दरात 113 रुपये म्हणजेच 0.13 टक्के वाढ झाली होती. चांदी 87300 रुपये प्रति किलोनं विकली जात आहे.
सराफा बाजारातील सोन्याचे दर
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची विक्री आज 76950 रुपयांना केली जात आहे. सोन्याचा दर 330 रुपयांनी स्वस्त झाला.
मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा दर 330 रुपयांनी स्वस्त झाला असून 76800 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नईत देखील मुंबई प्रमाणेच दर आहे. कोलकाता येथे देखील 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 330 रुपयांची घसरण झाली असून दर 76800 रुपयांवर आहेत.
तनिष्कमध्ये सोने विक्रीचा दर कितीवर?
देशातील ज्वेलर्स क्षेत्रातील बँड तनिष्कमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रमॅला 71500 रुपये असून आज 650 रुपयांची घसरण झाली आहे.
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पावेल यांनी 2025 च्या अखेर पर्यंत केवळ दोन वेळा व्याज दरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचा देखील सोने दरावर परिणाम झाला आहे.
सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी असल्यानं देखील सोने दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सोन्याचे दर 77 हजार रुपयांच्या आले आहेत त्याप्रमाणं चांदीचे दर देखील 90 हजारांच्या खाली आले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोने दरात घसरण सुरु होती. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोनं 300 रुपयांनी तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांपर्यंत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक सराफ बाजारत वेगवेगळे दर असतील.
इतर बातम्या :
सोने दरात MCX वर तेजी पण सराफा बाजारात घसरण, 300 पासून 600 रुपयांपर्यंत दर घसरले