Gold Silver rates 23 December : नवीन वर्ष 2023 ची (New Year 2023) सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडरचे दर वाढल्याचे दिसले, त्याबरोबरच सोन्या-चांदीच्या किंमतीतही वाढ होताना दिसली. आज 4 जानेवारी 2023 रोजी सोने-चांदीचे दर पाहता आज सराफा बाजारात सोन्याच्या (Gold Rates Today) किंमतीत किरकोळ वाढ दिसत आहे. तर चांदीचे भाव (Silver Rates Today) मात्र स्थिर आहेत.
आजचा सोने-चांदीचा भाव
इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, 22 कॅरेटसाठी सोन्याची किंमत 51,110 रुपये प्रति तोळा आहे. याचप्रमाणे 24 कॅरेटसाठी सोन्याची आजची किंमत 55,740 रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली आहे. तर चांदीच्या किंमतींमध्ये आज स्थिरता पाहायला मिळाली आहे. सराफा बाजारात आज बुधवारी चांदीच्या किंमती 72,000 रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत.
जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
शहर 22 कॅरेट सोने 24 कॅरेट सोने चांदी
मुंबई 50960 55590 72000
पुणे 50960 55590 72000
चेन्नई 51950 56670 72500
नवी दिल्ली 51110 55740 72000
बंगळूरु 51010 55640 75500
हैदराबाद 50960 55590 75500
केरळ 50960 55590 75500
बडोदा 51010 55640 72000
अहमदाबाद 51010 55640 72000
सोन्याच्या भावात किरकोळ वाढ, तर चांदीचे भाव स्थिर
मंगळवारी सोन्याची किंमत पाहता 22 कॅरेटसाठी 51,100 रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली होती. तर 24 कॅरेटसाठी काल 55,730 रुपये प्रती तोळा होती. कालच्या तुलनेत त्यात आज निव्वळ 10 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमती पाहता काल अंदाजे 7200 रुपये प्रती किलो नोंदवण्यात आल्या होत्या. याचाच अर्थ चांदीच्या किंमतीत कालच्या तुलनेत कोणतीही वाढ झालेली नाही.
महागाईचा पुन्हा एकदा फटका
भारतात ऐन लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यातच नव्या वर्षातच सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागतेय. नवीन वर्षाच्या सुरुवातील ग्राहकांना महागाईचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. मौल्यवान धातूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे. वाढणारी महागाई, चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग, तसेच डॉलर किंमतीतही वाढ झाली आहे. सोन्या-चांदीचे हे वाढलेले दर महाराष्ट्रासह, दिल्ली आणि कोलकातामध्येही सारख्याच प्रमाणात आहेत.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City)
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.