Mutual Fund Planning : भविष्यात अधिक नफा मिळविण्यासाठी लोक अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा कमी जोखीम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. 2023 या नवीन वर्षात सुरुवातीपासूनच जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि भविष्यात तुम्हाला लाखो कमवायची इच्छा असेल, तर तुम्हाला योग्यपणे नियोजन करावे लागेल.


म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवण्यासाठी SIP हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्हाला 5 वर्षात 50 लाख रुपये कमवायचे असल्यास, तुम्हाला किती पैसे गुंतवावे लागतील आणि तुम्हाला किती परतावा मिळेल? तसेच, तुम्ही कोणत्या प्रकारच्या फंडात पैसे गुंतवू शकता. याबाबत सविस्तर जाणून घ्या.


5 वर्षात 50 लाख रुपये कमवाल?


जे गुंतवणूकदार अधिक जोखीम घेऊन जास्त उत्पन्न मिळवण्याच्या विचारात आहेत, त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही फक्त 5 वर्षांत 50 लाख रुपयांचा नफा कमावू शकता. यासाठी फ्लेक्सी कॅप फंड किंवा मल्टी कॅप फंडात गुंतवणूक करावी. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांना या फंडांमध्ये गुंतवणूक करून 15 टक्के परतावा मिळू शकता. यासाठी गुंतवणूकदारांना एसआयपीद्वारे दरमहा 55,750 रुपये गुंतवावे लागतील.


SIP म्हणजे काय?


SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. म्हणजेच काय तर तुम्ही म्युच्युअल फंडात काही पैसे अंतराने टाकता आणि कमी जोखीम घेऊन तुम्ही अधिक गुंतवणूक मिळवू शकता.


'या' म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास मिळेल अधिक नफा


HDFC फ्लेक्सी कॅप फंडाने एका वर्षात 19.98 टक्के परतावा दिला आहे. तसेच क्वांट फ्लेक्सिकॅप फंडाने 13.64 टक्के मिळवून परतावा दिला आहे आणि ICICI प्रुडेन्शियल फ्लेक्सिकॅप फंडाने 11.20 टक्के परतावा दिला आहे. निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंडाने सरासरी 15.90 टक्के परतावा दिला आहे. याशिवाय, क्वांट मल्टीकॅप फंडाने 13.16 टक्के, कोटक मल्टीकॅप फंडाने 13.16 टक्के आणि एचडीएफसी मल्टीकॅप फंडाने 12.37 टक्के परतावा दिला आहे.


कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी काय करावे?


तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्या फंडाबाबत अधिक सविस्तर माहिती घ्यावी. तसेच, म्युच्युअल फंडांची तुलना करून पाहा. जोखीम आणि परताव्याच्या आधारावर तुम्ही कोणत्याही फंडात तुमच्या गुंतवणुकीची योजना करू शकता.


टीप : येथील बाबी केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. बाजारात गुंतवणूक करणे हे जोखमीचे आहे. एबीपी माझा पैसे गुंतवण्याबाबत कोणताही सल्ला देत नाही. त्यामुळे पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.