Gold Rate Today : आज आठवड्यातला शेवटचा दिवस म्हणजेच शनिवार. दिवाळीचा (Diwali 2022) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने ग्राहक सोन्या-चांदीची खरेदी (Gold-Silver Rate) करतात. मात्र, ग्राहकांसाठी आज सोने खरेदी करणं किंचित महाग पडू शकतं. याचं कारण कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली तीव्र वाढ. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमती सुमारे 12 टक्क्यांनी वाढल्या, ज्यामुळे जागतिक चलनवाढ आणि आर्थिक मंदीची चिंता वाढली. याचाच परिणाम भारतीय बाजारेपेठेवरही झाला असून सोन्याच्या किंमतीत अंशत: वाढ झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 60,700 रुपये आहे.   

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  47,630 60,700
पुणे 47,630 60,700
नाशिक  47,630 60,700
नागपूर 47,630 60,700
दिल्ली 47,548 60,600
कोलकाता  47,566 60,620

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) : 

ग्राहक आता घरी बसूनसुद्धा आजचे सोन्याचे दर तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता. मात्र, लक्षात ठेवा तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

महत्वाच्या बातम्या :