OTT Upcoming Projects : ओटीटीवर (OTT) गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या 'ताली' (Taali) पासून शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) 'फर्जी' (Farzi) पर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमांचा समावेश आहे. 


ताली - सुष्मिता सेन : सुष्मिता सेनचा आगामी 'ताली' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील सुष्मिताचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. या सिनेमात ती गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. 'ताली'मध्ये प्रेक्षकांना नाट्य, थरार आणि थ्रील पाहायला मिळणार आहे. 


इंडियन पुलिस फोर्स - सिद्धार्थ मल्होत्रा


'इंडियन पुलिस फोर्स' या सीरिजमध्ये अॅक्शनचा तडका असणार आहे. दिल्ली पोलिसांवर आधारित या वेबसीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. ही सीरिज 2023 मध्ये अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. 


फर्जी - शाहिद कपूर


'फर्जी' या वेबसीरिजच्या माध्यमातून शाहिद कपूर ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. या सीरिजमध्ये शाहिद कपूरसोबत विजय सेतुपती आणि राशी खन्नादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


द गुड वाइफ - काजोल


'त्रिभंगा' या वेबसीरिजमध्ये काजोल शेवटची दिसून आली होती. आता काजोलची 'द गुड वाइफ' ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 


गन्स एंड गुलाब - राजकुमार राव


राजकुमार राव लवकरच 'गन्स एंड गुलाब' या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये दुलकर सलमान, गुलशन देवैया आणि आदर्श गौरव मुख्य भूमिकेत आहे. 


सूप - मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेन


‘सूप’मध्ये  मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेन मुख्य भूमिकेत आहेत. 


द फॅमिली मॅन 3 - मनोज बाजपेयी


‘द फैमिली मैन’चा तीसरा सीझन पाईपलाईनमध्ये असून या वेबसीरिजच्या माध्यमातून मनोज बाजपेयी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. 


मिर्जापुर-3 - अली फजल


मिर्जापूरचा तीसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून अली फजल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Amruta Khanvilkar : नाकात नथ, कपाळावर कुंकू, नऊवारी साडी...; 'हर हर महादेव' सिनेमातील अमृता खानविलकरचा फर्स्‍ट लुक आऊट


Om Raut Exclusive: 'आदिपुरुष'च्या वादावर ओम राऊत थेटच बोलला, म्हणाला, सिनेमा पाहाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल