Gold Rate Today : आज आठवड्यातला पाचवा दिवस. नुकताच दसऱ्याचा (Dussehra 2022) सण साजरा झाला. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली होती. दसऱ्यानंतर अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली आहे. दिवाळी (Diwali 2022) अर्थातच दिव्यांचा, आनंदाचा, भरभराटीचा सण. त्यामुळे ग्राहकांची आतापासूनच दिवाळीची तयारी, नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात लगबग सुरु आहे. मात्र, ग्राहकांसाठी सोने खरेदीसाठी आजचा दिवस फारचा चांगला नाही. कारण सलग पाच दिवस सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) काही अंशी वाढच होताना दिसतेय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,890 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,510 रुपये आहे. 


तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 


मुंबईतील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  51,890
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 47,566


1 किलो चांदीचा दर - 61,510


पुण्यातील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,890
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,566


1 किलो चांदीचा दर - 61,510


नाशिकमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,890
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,566


1 किलो चांदीचा दर - 61,510


नागपूरमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,920


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,593


1 किलो चांदीचा दर - 61,540


दिल्लीमधील सोन्याचे दर   


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,050


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,796


1 किलो चांदीचा दर - 61,430


कोलकत्तामधील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 51,850


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 47,529


1 किलो चांदीचा दर - 61,460


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.


महत्वाच्या बातम्या :