Hustle 2.0 Srushti Tawde Rapper : सध्या बॉलिवूड गाण्यासोबच हिप-हॉप (Hip-Hop) गाण्यांची क्रेझ वाढताना दिसत आहे. अनेक रॅप रिॲलिटी शो (Reality Show) तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध करुन देत आहेत. अलिकडे एमटीव्ही (MTV) वरील हसल 2.0 (Hustle 2.0) शो प्रचंड गाजताना दिसत आहे. यामधील एका तरुणीच्या रॅपने (Rap Song) नेटकऱ्यांना पुरतं वेड लावलं आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक रॅप साँग प्रचंड व्हायरल होत आहे. 'भगवान बोल रहा हूँ...' (Bhagwan Bol Raha Hu) असे या गाण्याचे बोल आहेत. या रॅप साँगची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे.


MTV चॅनेलवर सध्या हसल 2.0 (Hustle 2.0) हा शो सुरु आहे. हा शो रॅपर्ससाठी उत्तम प्लॅटफॉर्म बनला आहे. देशभराच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धक या शोमध्ये आपलं रॅप साँग सादर करतात. सध्या तरुणाईमध्ये हिप-हॉपची क्रेझ आहे. त्यामुळे हसल 2.0 शोला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. इतकंच नाही तर या शोमधील काही स्पर्धकांनी नेटकऱ्यांच्या मनात विशेष पसंती मिळवली आहे. सध्या मराठमोळ्या तरुणीचं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'भगवान बोल रहा हूँ...' असे या रॅप साँगचे बोल आहे. 






हसल 2.0 शोमधील स्पर्धक सृष्टी तावडे (Srushti Tawde) हीने गायलेलं 'Chill Kinda Guy' हे रॅप साँग प्रेक्षकांच्या चांगलं पसंतीस उतरलं आहे. 'भगवान बोल रहा हूँ...' अशा या रॅपमधील ओळी आहेत. 'तेरा राज खोल रहा हूँ, तेरा अच्छा, बुरा, पाप, पुण्य सब तोल रहा हूँ, भगवान बोल रहा हूँ' असे या रॅप साँगचे बोल आहे. सध्या हे रॅप साँग अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलं आहे. 


व्हायरल रॅप व्हिडीओ येथे पाहा



MTV चॅनेलवर सध्या हसल 2.0 (Hustle 2.0) शोमध्ये रॅपर बादशाह (Badshah) परीक्षकांच्या भूमिकेत आहे. सृष्टीचं हे रॅप ऐकून बादशाह ही थक्क झाला. त्याने सृष्टीला भरभरून दाद दिली. सध्या हसल 2.0 शोचा प्रेक्षक वर्ग वाढताना दिसत आहे. या शोमधील अनेक स्पर्धक आणि रॅप साँगची सोशल मीडियावर खूप क्रेझ आहे.