Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती सातत्याने बदलत असतात. मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोयत सोन्याच्या दरात घसरण होताना दिसतेय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, सोन्याच्या दरात स्थिरता कायम आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 51,680 रूपयांवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर 58,060 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते पाहा.  

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  47,373 58,060
पुणे 47,373 58,060
नाशिक  47,373 58,060
नागपूर 47,373 58,060
दिल्ली 47,300 57,960
कोलकाता  47,318 57,980

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :