Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही तेजीचे संकेत दिसून येत आहेत. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर 462 अंकांनी वधारत  54213.55 अंकांवर सुरू झाला. तर निफ्टीमध्ये 134 अंकांची उसळण दिसून आली. निफ्टी निर्देशांक 16124.40 अंकांवर खुला झाला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्याचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावर दिसून आले असल्याचे म्हटले जाते.


आज सेन्सेक्स निर्देशांक 54,146 च्या पातळीवर सुरू झाला.  तर, एनएसईचा निफ्टी निर्देशांक 16,113 च्या पातळीवर उघडला. बाजार सुरू होताच काही मिनिटांतच सेन्सेक्स 376.57 अंकांनी वधारला. तर, निफ्टी 116 अंकांनी वधारला आहे. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 264 अंकांनी वधारत 54,015.62 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 79.40 अंकांच्या तेजीसह 16,069.20 अंकांवर व्यवहार करत होता. 


निफ्टीमधील 50 पैकी 44 शेअर तेजीत आहेत. तर, सहा शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. बँक निफ्टीतही मोठी तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टीत 314.95 अंकांची तेजी असून  34,639 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. 


टायटन 4.94 टक्क्यांनी,  तर, एशियन पेंट्स 2.24 टक्क्यांनी वधारला आहे. बीपीसीएलचा शेअर दर 2.05 टक्क्यांनी तेजीत आहे.  विप्रोच्या शेअर दरात 1.77 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ओएजीसी शेअर दरात 1.61 टक्के आणि पॉवरग्रीडमध्ये 1.59 टक्क्यांची वाढ झाली आहे. 


बजाज फिनसर्व्हमध्ये 10.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर दरात 0.92 टक्क्यांची घसरण झाली आहे. बजाज फायनान्समध्ये 0.55 टक्के, ब्रिटानियामध्ये 0.32 टक्के आणि सिप्लामध्ये 0.29 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. 


दरम्यान, बुधवारी शेअर बाजार तेजीत बंद झाला. सेन्सेक्समध्ये 616 अंकांची वाढ झाल्याचं दिसून आले.  निफ्टीमध्ये 178 अंकांची वाढ झाली, बँक निफ्टीही 508 अंकांनी वधारला होता. बुधवारी शेअर बाजार बंद होताना 1779 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 1436 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 131 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.