Gold Rate Today : आज 5 नोव्हेंबर. आजपासून तुळशी विवाहाला (Tulsi Vivah 2022) सुरुवात झाली. तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होते. याच निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) कमी झाले असतानाच आज सकाळपासूनच सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. याचं कारण म्हणजे, जागतिक बाजारात महागड्या धातूंच्या किमतीत झालेल्या दरवाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला. या कारणामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,950 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 60,580 रुपये आहे.    

  


तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 


मुंबईतील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  50,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 46,704


1 किलो चांदीचा दर - 60,580


पुण्यातील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,704


1 किलो चांदीचा दर - 60,580


नाशिकमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,704


1 किलो चांदीचा दर - 60,580


नागपूरमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,950


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,704


1 किलो चांदीचा दर - 60,580


दिल्लीमधील सोन्याचे दर  


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,870


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,631


1 किलो चांदीचा दर - 60,480


कोलकत्तामधील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 50,89


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 46,649


1 किलो चांदीचा दर - 60,500


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.  


महत्वाच्या बातम्या : 


काय सांगता! ग्राहक यावेत म्हणून चक्क महामार्गावरिल दुभाजक काढून वळण रस्ता तयार केला; 15 व्यवसाईकांवर गुन्हे दाखल