Gold Rate Today : साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसरा सण अवघा एक दिवसांवर आहे. या निमित्ताने ग्राहक अनेक वस्तूंची खरेदी करतात. घरात नवीन वस्तू, सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदी करतात. तसेच, काही ग्राहक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याच्या नाण्यांमध्ये गुंतवणूक करतात. जर, तुम्हाला सोने-चांदीची खरेदी करायची असेल तर तर ग्राहकांसाठी आज सोन्याचा दर काहीसा वधारला आहे. याचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किंमतीत वाढ झाली आहे. याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून आला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,120 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,160 रुपये आहे. 


तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 


मुंबईतील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  51,120
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 46,860


1 किलो चांदीचा दर - 61,160


पुण्यातील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,120
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,860


1 किलो चांदीचा दर - 61,160


नाशिकमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,140
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,878


1 किलो चांदीचा दर - 61,220


नागपूरमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,140


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,878


1 किलो चांदीचा दर - 61,220


दिल्लीमधील सोन्याचे दर   


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,050


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,796


1 किलो चांदीचा दर - 61,120


कोलकत्तामधील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 51,070


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 46,814


1 किलो चांदीचा दर - 61,140


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.


महत्वाच्या बातम्या :