India: सध्या काही कुटुंबांमध्ये एकापेक्षा जास्त लोक कमवतात. पण तरी देखील महागाईमुळे महिन्याच्या शेवटी पैशांची चणचण काही लोकांना जाणवते. महागाई वाढल्यानं काही लोक नोकरी, व्यावसाय यांसोबतच एखादा जोडधंदा देखील करतात. नोकरी किंवा व्यवसाय करताना कामानिमित्त बऱ्याच वेळा इतर शहरांमध्ये किंवा देशामध्ये जावं लागतं. पण जर तुम्हालाघरबसल्या पैसे कमावयचे असतील, तर तुम्ही या कल्पनांबाबत विचार करु शकता. या आयडिया फॉलो केल्यानं तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता.


1. युट्यूब चॅनल
जर तुमच्याकडे कोणतीही कला असेल तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ती लोकांसमोर मांडून पैसे कमवू शकता. विविध व्लॉग, कुकिंगचे व्हिडीओ, गाणी, रिव्हू इत्यादी  व्हिडीओ युट्यूब चॅनलवर तुम्ही अपलोड करु शकता. जर तुम्ही संभाषण आणि व्हिडिओ एडिटिंग चांगल्या पद्धतीनं करु शकता तर तुम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दर महिन्याला हजारो रुपये कमवू शकता.


2. फ्रीलान्सिंग
जर तुमच्याकडे कंटेंट रायटर, व्हिडिओ एडिटर, डेव्हलपर, ग्राफिक डिझायनर हे कौशल्य असेल, तर तुम्ही घराबाहेर न पडता कमाई करण्यासाठी फ्रीलांसिंगचे काम सहजपणे शोधू शकता. फ्रीलान्सिंगचे काम मिळवण्यासाठी काही फ्लॅटफॉर्म्स किंवा काही वेब साईट्स देखील आहेत. या फ्लॅटफॉर्म्स आणि वेब साईट्सवर तुम्ही तुमच्या कामाची आणि तुमची माहिती टाकून  काम शोधू शकता.


3. एअरबीएनबी होस्टिंग
तुमच्या घरी एक रुम असेल जिचा वापर तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमच्या शहरात राहण्यासाठी चांगली ठिकाणे शोधत असलेल्या प्रवाशांना होस्ट करून ती रुम काही दिवसांसाठी त्यांना वापरायला देऊ शकता. एअरबीएनबी हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमच्या घराची नोंदणी करु शकता. तुमच्या घरातील एक रुम प्रवासी अल्प कालावधीसाठी बुक करू शकतात आणि तुम्हाला त्यासाठी पैसे मिळतात.


4. शिकवणी
घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनं विद्यार्थांची शिकवणी घेऊन देखील तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्ही शिकवणी घेण्यासाठी युट्यूब आणि व्हिडीओ कॉल इत्यादींचा वापर करु शकता. 


5.एफिलिएट मार्केटिंग 
तुम्ही चांगले कंटेंट क्रिएटर असाल किंवा लोकांना वस्तू विकण्याचे कौशल्य तुमच्याकडे असेल, तर तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करु शकता. अनेक व्यवसाय, ईकॉमर्स साइट आणि ब्रँड आहेत जे त्यांची उत्पादने विकू शकतील अशा लोकांना शोधत आहेत. एफिलिएट मार्केटिंग करुन तुम्ही त्या ब्रँडच्या वस्तू किंवा उत्पादने विकून कमिशन कमवू शकता.  


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Job Majha : दूरसंचार विभाग, महावितरण आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये भरती सुरू, 'असा' करा अर्ज