Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळतात. आज आठवड्यातला शेवटचा दिवस म्हणजे शनिवार. गेल्या आठवडाभरात जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती कमी झाल्याचा हा परिणाम आहे. हेच दर कायम ठेवत आज सोन्याच्या दरात काहीही फरक पडलेला नाही. सोन्याचे दर जे काल (शुक्रवारी) होते तेच दर आज आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,330 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 67,500 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 49,803 | 67,500 |
पुणे | 49,803 | 67,500 |
नाशिक | 49,803 | 67,500 |
नागपूर | 49,803 | 67,500 |
दिल्ली | 49,711 | 67,390 |
कोलकाता | 49,729 | 67,410 |
जागतिक बाजारपेठेतील दर :
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% कमी होऊन $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.3% कमी होऊन $1,796.50 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.6% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले.
सोनं खरेदी करण्यापूर्वी 'अशी' तपासा सोन्याची शुद्धता (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
Petrol Diesel Price Today: सीएनजी महागलं, पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या आजचे दर