Gold Rate Today : भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे तसेच चांदीचे दर काहीसे वाढताना दिसत आहे. मागच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात तफावत दिसून येत आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.54 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 53,840 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. 


सोन्या-चांदीचे ताजे दर : 


आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) वर सोन्याचे फ्युचर्स 0.54 टक्क्यांनी वाढून 53,840 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 49,800 रूपये झाला आहे. चांदीचा दर 0.07 टक्क्यांनी घसरून 50 रुपयांनी घसरून 66,783 रुपये प्रति किलोवर पोहोचला. मागच्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या दरात जवळपास 600 रूपयांची वाढ झालेली आहे. 


जागतिक बाजारपेठेतील दर : 


स्पॉट गोल्ड 0116 GMT नुसार 0.2 टक्क्यांनी घसरून $1,934.10 प्रति औंस होता. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.7 टक्क्यांनी घसरून $1,940.20 वर आले. या आठवड्यात धातू सुमारे 1.1 टक्क्यांनी घसरला आहे.


तुमच्या शहराचे दर तपासा :


तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 


महत्वाच्या बातम्या :