Gold Rate Today : रशिया-युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरुच आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच भारतीय बाजारात अनेक वस्तूंचे दर महागले. सोन्या-चांदीच्या (Gold and Silver) दरातही काहीशी अस्थिरता पाहायला मिळतेय. आज सोन्या-चांदीच्या दरात फारसा फरक दिसून आला नाही. खरंतर गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीचे जे दर होते त्यात साधारण किंचित रूपयांनी वाढ झाली आहे. जाणून घ्या ताजे दर काय आहेत. 


सोन्या-चांदीचे ताजे दर (Gold Rate Today) : 


आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचे फ्युचर्स 0.56 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 53,450 रूपये झाला आहे. तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 49,000 रूपये झाला आहे. तर 1 किलो चांदीचा दर 68,007 रूपये झाला आहे. 


तुमच्या शहराचे दर तपासा :


तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 


महत्वाच्या बातम्या :