Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर सतत कमी-आधिक होत असतात. याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) किंचित घसरण दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत (Diwali 2022) ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,920 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 57,400 रुपये आहे.   


तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 


मुंबईतील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  50,920
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 46,677


1 किलो चांदीचा दर - 57,400


पुण्यातील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,920
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,677


1 किलो चांदीचा दर - 57,400


नाशिकमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,920
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,677


1 किलो चांदीचा दर - 57,400


नागपूरमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,920


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,677


1 किलो चांदीचा दर - 57,400


दिल्लीमधील सोन्याचे दर  


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,860


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,622


1 किलो चांदीचा दर - 57,310


कोलकत्तामधील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 50,880


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 46,640


1 किलो चांदीचा दर - 57,340


जागतिक बाजारातील सोन्या-चांदीचे दर : 


जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.35 टक्क्यांनी घसरून $1,689.01 प्रति औंस झाली. बुधवारीही सोन्याचा भाव 0.41 टक्क्यांनी घसरला होता. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 1.86 टक्क्यांनी घसरून 19.76 डॉलर प्रति औंस झाली आहे. तथापि, शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच सोमवारी चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली.


तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) : 


ग्राहक आता घरी बसूनसुद्धा आजचे सोन्याचे दर तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता. मात्र, लक्षात ठेवा तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 


महत्वाच्या बातम्या :