Share Market Opening Bell: जागतिक शेअर बाजारात असलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. गुंतवणूकदारांकडून विक्री सुरू असल्याने बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित घसरणीसह सुरू झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 13 अंकांच्या घसरणीसह 57,512.74 अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 36 अंकांच्या घसरणीसह 57,512.74 अंकांवर खुला झाला. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 374 अंकांच्या घसरणीसह 57,251.61 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 100 अंकांच्या घसरणीसह 17,017.25 अंकांवर व्यवहार करत होता.
आज शेअर बाजारातील व्यवहारांमध्य सुरुवातीच्या टप्प्यात ऑटो, फार्मा, मेटल्स, एफएमसीजी, एनर्जीच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, आयटी, बँकिंग, रिअल इस्टेट, आदी क्षेत्रात घसरण दिसून आली. स्मॉल कॅपमध्ये तेजी दिसत असून मिड कॅपमध्ये घसरण दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील फक्त 20 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसत असून 30 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 14 शेअरमध्ये तेजी दिसत असून 16 शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे.
तिमाही निकालानंतर विप्रोच्या शेअर दरात 5.11 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तर, एचडीएफसीमध्ये 1.02 टक्के, टीसीएसमध्ये 0.74 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 0.71 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 0.56 टक्के, बजाज फायनान्सच्या शेअर दरात 0.46 टक्क्यांची घसरण दिसून आली.
बुधवारी बाजार वधारला
बुधवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 478 अंकांच्या तेजीसह 57,625 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत (Nifty) 140 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी 17123 अंकांवर बंद झाला. स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्येही तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 43 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, सेन्सेक्समधील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.