Gold Rate Today : सोन्याच्या दरात किंचित घट; तर चांदी एक हजारांनी महाग, काय आहेत ताजे दर

Gold Rate Today : आज 24 कॅरेट सोन्याचा दर 53,020 वर पोहोचला आहे. इतर शहरातील ताजे दर काय आहेत ते जाणून घ्या. 

Continues below advertisement

Gold Rate Today : रशिया-युक्रेनमधील युद्ध 50 दिवस होत आले तरीही अजून सुरुच आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात काहीशी तफावत दिसून येते. मागच्या दोन आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घट दिसून येत होती. गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 53,020 वर पोहोचला आहे. तर चांदीचा दर 68,100 झाला आहे. इतर शहरातील ताजे दर काय आहेत ते जाणून घ्या. 

Continues below advertisement

शहर  दर 
मुंबई 48,600
पुणे 48,700
नागपूर 48,700
दिल्ली 49,000
कोलकाता 49,000
चेन्नई  49,100

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola