Share Market Updates : शेअर बाजारात आजही विक्रीसाठी दबाव असल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजारावर जागतिक शेअर बाजारातील संमिश्र संकेताचा परिणाम दिसून आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीसह सुरू झाली.
शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. सेन्सेक्सची सुरुवात 221 अंकाच्या घसरणीसह 58,743 या पातळीवर झाली. निफ्टीमध्ये 90 अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी 17,584 अंकावर झाली. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये घसरण दिसून आली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 500 अंकाची तर, निफ्टीमध्ये 171.65 अंकाची घसरण दिसून आली.
निफ्टीतील 50 पैकी फक्त 6 शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. तर, 43 शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. बँक निफ्टीमध्ये 200 अंकापेक्षा अधिक घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी टीसीएसच्या निकालानंतर शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील शेअरमधील घसरण थांबली.
मारूतीचा शेअर दर 1.24 टक्क्यांनी वधारला आहे. तर, एचसीएल टेकचा शेअर दर 0.53 टक्क्यांनी वधारला आहे. टीसीएसमध्ये 0.43 टक्के, त्याशिवाय अदानी पोर्ट्समध्ये 0.10 टक्क्यांनी वधारला आहे. सिप्ला शेअर दरामध्ये 0.07 टक्क्यांची उसळण दिसून येत आहे.
हिंदाल्कोमध्ये 3.06 टक्के आणि कोल इंडियामध्ये 2.06 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. टाटा मोटर्समध्ये 1.91 टक्क्यांनी घसरण दिसत आहे. टाटा स्टीलमध्ये 1.37 टक्के आणि बीपीसीएलमध्ये 1.26 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण दिसून आली. तर, तर, निफ्टीत 90 अंकाची घसरण झाली. प्री-ओपनिंगपासून शेअर बाजारावर विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Veranda Learning Solutionsची शेअर बाजारात दमदार एन्ट्री; 'या' किंमतीवर झाली लिस्टिंग
- Weight Loss : वजन घटवा, बोनस मिळवा; 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर!
- Electric vehicles: देशात इलेक्ट्रिक कार तेजीत, गेल्या आर्थिक वर्षात EV च्या विक्रीत तीन पटीने वाढ