Gold Rate Latest News : तुम्हाला सध्याच्या पातळीवर सोन्यात गुंतवणूक करायची असेल आणि येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव वाढतील की नाही आणि ते कुठे जाईल हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही कमोडिटी मार्केटच्या तज्ज्ञांमार्फत हे जाणून घेऊ शकता. सध्या सोन्याच्या दरात वाढ होण्याचा ट्रेंड कायम आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसा, या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान 24 कॅरेट सोन्याचा दर 31 ऑक्टोबर रोजी 50,480 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 50,522 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.


या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव 52 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सोन्याच्या दरात वाढ होण्याच्या शक्यतेची काही महत्त्वाची कारणे त्यांनी दिली आहेत, जी जागतिक आणि देशांतर्गत संकेतांशी जोडलेली आहेत असं मतमुंबईचे केडिया अॅडव्हायझरीचे एमडी अजय केडिया यांच्या मांडलं आहे.


डॉलर निर्देशांक घसरल्याने सोन्याला बळ 
साधारणपणे डॉलरची ताकद सोन्याच्या किमती कमी आणि नियंत्रणात ठेवते, तर डॉलर कमजोर झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढते, कारण डॉलर कमजोर झाल्यावर अधिक सोने खरेदी करता येते. डॉलरचा निर्देशांक खाली जात असल्याने सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, भू-राजकीय तणाव, प्रामुख्याने युक्रेन आणि रशिया यांच्यातील सतत लष्करी संघर्षामुळे सोन्याचे भाव वाढू शकतात. कारण या युद्धाला सुरुवात झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती, पण नंतर इतर कारणांनी वरचढ ठरल्याने सोन्याच्या भाववाढीचा हा ट्रेंड थांबला. मात्र आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे.


मंदीच्या भीतीने सोन्यात गुंतवणूक करणे हा सुरक्षित पर्याय 
अमेरिका आणि युरोपमधील वाढती महागाई आणि व्याजदर यामुळे मंदीची भीती अधिक गडद होऊ लागली आहे. पुढील वर्षी जर अमेरिकेत मंदी आली तर गुंतवणूकदार इक्विटी आणि रिअल इस्टेट मार्केटपेक्षा सोन्यात गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानतील आणि त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने त्याच्या किमतीत वाढ होऊ शकते असं जाणकारांचं मत आहे.


सोन्याच्या किमतीतील सुधारणांमुळे मूल्यांकन आकर्षक 
देशांतर्गत बाजारात ऑगस्ट 2020 मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,500 च्या आसपास होती. त्याप्रमाणे यावर्षी मार्चमध्ये हा दर 55,400 च्या आसपास होता. सध्या सोन्याचा सध्याचा भाव 50,522 आहे, म्हणजेच सोन्याच्या किमती उच्च पातळीपासून सुमारे 8 ते 10 टक्क्यांनी घसरल्या आहेत. अशा परिस्थितीत लोक सोन्यात गुंतवणुकीकडे आकर्षित होतील.


भारत-चीनमध्ये सोन्याची मागणी वाढली
सणासुदीच्या काळात भारतात सोन्याची मागणी वाढली आहे. गोल्ड मायनर्स लॉबी वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने जानेवारी-सप्टेंबर या कालावधीत सोन्याच्या दागिन्यांची मागणी 381 टन होती, जी तिसऱ्या तिमाहीत जास्त होती असं निरीक्षण नोंदवलं आहे. भारतात सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचप्रकारे चीनमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू होणार आहे, त्यामुळे तेथेही सोन्याची मागणी वाढल्याने किंमत वाढू शकते.