Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात एकेक करून कारखान्याची धुरांडी सुरु होत असतानाच शिरोळ तालुक्यात मात्र अजूनही आंदोलनाचे लोण कायम आहे. तालुक्यात आज ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले. ऊस वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने हाणामारी झाली. शिरटी फाट्यावर हा सगळा घडला. आंदोलन अंकुशकडून शिरटी फाट्यावर वाहतूक रोखण्यात येत होती. त्यामुळे कारखाना समर्थकही त्या ठिकाणी दाखल झाले. समर्थकांकडून ऊस वाहतूक करणारी वाहन पुढे सोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते ट्रॅक्टरसमोर आडवे पडले. या प्रकारानंतरही वाहने रेटण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. 


कोल्हापूर जिल्ह्यात 17 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु  


दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील 17 कारखान्यांमध्ये गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे. 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस लांबल्याने आणि तसेच शिवारामध्ये पाणी साचल्याने ऊसतोड लांबली. गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने धुराडी पेटण्यास सुरुवात झाली आहे. 


यावर्षीच्या हंगामासाठी 10.25 रिकव्हरीला प्रति टन 3 हजार 50 रुपये दर निश्चित केला गेला आहे. यापेक्षा जास्त दर द्यायचा असेल तर संबंधित कारखान्याने तो जाहीर करून हंगाम सुरू करण्यास सूचना साखर आयुक्तांनी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी पहिल्या उचलीची घोषणा केली आहे. हंगाम संपल्यानंतर शेवटी मिळणार्‍या उताऱ्याच्या आधारावर उर्वरित रक्कम द्यायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 11 सहकारी कारखाने व खासगी पाच गाळप परवाना मिळाला आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या कारखान्याकडून किती दर 



  • बिद्रीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील उच्चांकी 3209 प्रतिटन

  • डी. वाय. पाटील साखर कारखाना 3 हजार रुपये प्रतिटन

  • संताजी घोरपडे कारखाना 3 हजार रुपये प्रतिटन

  • मंडलिक कारखाना हमिदवाडा 3 हजार रुपये प्रतिटन

  • शाहू कारखाना 3 हजार रुपये प्रतिटन

  • अन्नपूर्णा कारखाना केनवडे 2921रुपये प्रतिटन 

  • दालमिया भारत शुगर 3016 रुपये 

  • गुरुदत्त शुगर्सकडून 2903 प्रतिटन

  • शरद कारखान्याकडून 2900 प्रतिटन

  • वारणा 3025 प्रतिटन 


इतर महत्वाच्या बातम्या