Gold Price Today, 6 December 2021: सोन्याच्या किंमतीत आज क्वचित वाढ पाहायला मिळाली. सोन्याचा आजचा दर 47 हजार 520 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. काल एक तोळा सोन्याची विक्री 47 हजार 510 रुपयानं केली जात होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळं सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. देशात लग्नसराईचा हंगाम असल्यानं सोन्याची मागणी वाढत आहे. ज्यामुळं सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळू शकते. 


गुडरिटर्न वेबसाईटनुसार, दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 51 हजार 180 रुपये इतका आहे. चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकाता येथील सोन्याचा भाव 49 हजार 570 रुपये आहे. तर, मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 529 रुपये आहे. 


सोन्याची शुद्धता कशी ओळखतात?


सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येतं. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असतं. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात. सोनं जितकं जास्त कॅरेटचं तितकी त्याची गुणवत्ता चांगली. त्यामुळं त्याची किंमतही वाढत जाते. हॉलमार्क असणे ही सरकारी गॅरंटी असून ग्राहकांनी सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे का? याची तपासणी करावी आणि त्याची खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलंय.


तुम्हाला आता घरबसल्या सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घेता येणार आहे. इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याचे आजचे दर जाणून घेता येऊ शकतात. 


हे देखील वाचा-