Gold Price : सोन्याची खरेदी (Gold) करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. देशातील सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना एक प्रकराचा दिलासा मिळाला आहे. नेमकी सोन्याच्या दरात किती घसरण झाली? याबाबतची माहिती पाहुयात.
कोणत्या शहरात सोन्याला किती दर?
दिल्ली: 24 कॅरेट सोने 330 रुपयांनी स्वस्त होऊन 76,950 रुपये झाले आहे.
मुंबई : 24 कॅरेट सोने 330 रुपयांनी स्वस्त होऊन 76,800 रुपये झाले आहे.
चेन्नई : 24 कॅरेट सोने 330 रुपयांनी स्वस्त होऊन 76,800 रुपये झाले आहे.
कोलकाता : 24 कॅरेट सोने 330 रुपयांनी स्वस्त होऊन 76,800 रुपये झाले आहे.
MCX वर आज सोन्याचा भाव किती?
आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात वाढ दिसून आली आहे. दरात 164 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह MCX वर सोने 75815 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर चांदीच्या किमतीवर नजर टाकली तर 113 रुपयांची वाढ दिसून येत असून ती 87300 रुपये प्रति किलो या भावाने विकली जात आहे.
तनिष्कमध्ये सोन्याचा भाव किती आहे
देशातील मोठ्या ज्वेलर्स ब्रँड्समध्ये तनिष्कचे नाव अग्रगण्य ब्रँडमध्ये घेतले जाते. त्याच्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि त्यात 650 रुपयांची घसरण दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेणं परवड नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला मोठ्या संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. कारण, सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फायद्याची ठरत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. यामुळं सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. दुसऱ्या बाजदुला सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं शक्य नाही. त्यामुळं सोन्याच्या किंमती कधी कमी होणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं खरेदीदारांनी सोने खरेदी चांगली संधी आहे.