Jalgaon Accident News: जळगाव जिल्ह्यात हळदीचा कार्यक्रम आपटून रावेरकडे येत असताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरातील सहा मित्र हळदीचा कार्यक्रम आपटून रावेरकडे येत असताना सावदा पिंपरुड रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडावर कार आढळल्याने भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जात असलेली कार होंडा सिटी कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात सावदा पिंपरुड रस्त्यावर मध्य रात्रीच्या सुमारास घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरातील सहा मित्र हळदीचा कार्यक्रम आपटून रावेरकडे येत असताना सावदा पिंपरुड रस्त्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आढळल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण घटनेमध्ये तीन जण जागीच ठार झाले असून तिघांची प्रकृती ही गंभीर आहे. त्याच्यावर जळगावमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात होंडा सिटी कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार मयत झालेल्यांची नावे शुभम दशरथ सोनार, मुकेश किशोर रायपूरकर, जयेश केशव भोई राहणार रावेर अशी आहेत. तर गणेश भोई, अक्षय उन्हाळे व विकी जाधव हे गंभीर जखमी असून यांच्यावर खाजगी रुग्णालयात जळगाव येथे उपचार सुरू आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रावेरमध्ये या घटनेने शोककळा पसरली आहे.


ताम्हिणी घाटात खाजगी बस घाटात पलटी झाल्याने अपघात 


पुण्यावरून रायगड दिशेकडे येत असताना तीव्र उतारावर अंदाज न आल्याने भीषण अपघात घडला आहे. अपघातात एकूण 45 प्रवाशी प्रवास करत होते. त्यातील 25 हून अधिक प्रवाशी जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाड येथील बिरवाडीमध्ये लग्नाला येतं असताना बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. 3 महिला आणि 2 पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे.


अपघात स्थळी माणगाव मधील रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. पुण्यावरून रायगडच्या दिशेकडे येत असताना ताम्हिणी घाटातील तीव्र वळणावर ही बस कोसळली आणि अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकूण 45 प्रवाशी या बसमधून प्रवास करत होते .त्यामधील बरेचसे प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. काही प्रवाशी बसखाली अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.अपघात स्थळी रुग्णवाहिका दाखल झाली आहे. बचावकार्य सुरू आहे.