Gold Price News : सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात (Gold Price) गेल्या 5 दिवसात 4000 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा आधार मिळाला आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळाले होते,अजूनही ही घसरण सुरूच आहे.


गेल्या 24 तासाच्या आत सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर गेल्या पाच दिवसात  जवळजवळ 4 हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेत  डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी जी काही धोरणे जाहीर केली आहेत, त्या धोरणांचा परिणाम म्हणून दरात घसरण होत असल्याचं बोललं जात आहे. ट्रम्प सरकारची धोरण गुंतवणूकदारांसाठी लाभदायक राहणार असल्यान, गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याकडे वळवला आहे. त्यामुळं सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे दर केवळ जागतिक पातळीवरच नव्हे तर जळगावच्या सुवर्ण नगरीमध्येही कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्यापर्यंत हे दर अशाच पद्धतीने कमी अधिक होण्याची शक्यता जळगावमधील सोने व्यवसायिकांनी केली आहे. 


डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा जळगावातील सोने बाजारावर परिणाम


अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष निवडीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यानंतर जागतिक पातळीवर झालेल्या आर्थिक घडामोडीचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीमध्येही पाहायला मिळाला आहे. सोन्याच्या दरांत दोन दिवसांत दोन हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की, आपण विजयी झाल्यावर युद्ध शमवण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्या या घोषणेनंतर त्यांचा विजय झाला असल्यानं, जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निवळेल, अशी आशा गुंतवणूक दारात निर्माण झाल्यानं, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळलेले ग्राहक पुन्हा अन्य ठिकाणी गुंतवणुकीकडे वळू लागले आहेत. त्यांचा परिणाम म्हणूनच सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली आणि सोन्याच्या दरांत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे, असा दावा सोनं व्यावसायिकांनी केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. अशातच आता घसरण झाल्यानं दिलासा मिळाला आहे.


महत्वाच्या बातम्या:


Gold Rate : तिकडे डोनाल्ड ट्रम्प जिंकले, इकडे जळगावात सोने दोन हजारांनी स्वस्त, तोळ्याचा भाव किती?