Raj Thackeray On Sada Sarvankar मुंबई: मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray), शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माहीम विधानसभा मतदारसंघाची खूप चर्चा होताना दिसत आहे. तसेच माहीममध्ये अनेक राजकीय घडामोडी देखील घडल्याचे पाहायला मिळाले. 

Continues below advertisement


मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने महायुतीकडून उमेदवार दिला जाणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तसेच शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सदा सरवणकर माघार घेणार असल्याचे बोलले जात होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदा सरवणकर हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी भेटण्यास गेले होते. पण राज ठाकरेंनी सदा सरवणकरांची भेट नाकारली. भेटीनंतर राज ठाकरे जो आदेश देतील तो पाळणार होतो. भेट घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता, अशी प्रतिक्रिया सदा सरवणकरांनी दिली. आता राज ठाकरेंनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना यावर भाष्य केलं आहे. 


राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?


मला सदा सरवणकर भेटायला आले होते. परंतु मी भेटलो नाही. कारण त्यांच्याशी काय बोलणार? त्यांच्याशी काय चर्चा करणार? हा विषय आता संपला आहे, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.  तसेच राज ठाकरेंनी चर्चा न करताच माहीममध्ये उमेदवार दिला, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर देखील राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंची ही पहिली निवडणूक आहे. माझी चौथी-पाचवी निवडणूक आहे. त्यामुळे चर्चा काय करणार, असं राज ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे याआधी ज्या पक्षात होते, त्यावेळी ते फक्त ठाणे बघत होते, असंही राज ठाकरेंनी सांगितले. 


मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो- राज ठाकरे


आज अमित ठाकरेंच्या विरोधात जी माणसे उभी आहेत, त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, मात्र त्या घाणीत मला हात घालायचा नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसे हवीत. अमित राज ठाकरे असे जरी नाव असले तरी तुम्हाला त्याला भेटण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. 


संबंधित बातमी:


Raj Thackeray: भर सभेत फोन, पुढची सभा रद्द; भाषण सुरु असताना मंचावर नेमकं काय घडलं?, राज ठाकरेंनी सर्व सांगितलं, Video