Gold News : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Rate) सातत्यानं वाढ होत आहे. वाढत्या सोन्याच्या दरामुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. एकीकडे सोन्याच्या वाढत्या दरामुळं ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत असताना दुसऱ्या बाजूला गुंतवणूकदारांना (Invetsment) मात्र, मोठा नफा मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोन्यात केलेली गुंतवणूक ही गुंतवणूकदारांच्या फायद्याची ठरत आहे. गुंतवणुकदारांनी 1 महिन्यात 396 कोटी रुपये कमावले आहेत. 


एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांनी कमावले 396 कोटी रुपये 


एका बाजूला सोन्याच्या वाढत्या किंमती समस्या बनत आहेत. मात्र, गुंतवणूकदारांना याचा फायदा होत आहे. एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांनी 396 कोटी रुपये कमावले आहेत. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे लोकांसाठी फायद्याचे ठरत आहेत. त्यामुळं अनेकजण सोन्यात गुंतवणूक करत आहेत. 2023 मध्ये सोन्याच्या गुंतवणुकीतून गुंतवणुकदारांनी 2920 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. तर यावर्षी एका महिन्यातच म्हणजे एप्रिलमध्ये 396 कोटी रुपये मिळवले आहेत.


आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ


देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दर 73 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. सध्या सोन्याचा दर हा 73510 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. नागरिकांनी सुरक्षीत गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य दिलं आहे. यामाध्यमातून त्यांनी मोठा नफा मिळवलाय. 


वाढत्या दराचा ग्राहकांना फटका बसत असला तरी देखील गुंतवणुकदारांना फायदा होत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी होत असते. मात्र, दरात वाढ होत असल्यानं सर्वसामान्य ग्राहक सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवत आहेत.  


महत्वाच्या बातम्या:


सोन्याचा वापर करण्यात भारत आघाडीवर, 'या' देशातून होते सर्वाधिक सोन्याची आयात?