Horoscope Today 13 May 2024 : आज 13 मे 2024, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. तुम्ही तुमच्या मेहनतीने सर्व कामं यशस्वीपणे पार पाडू शकता. मिथुन राशीच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या
मेष (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - आनोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी दिरंगाईमुळे तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. नोकरी करणाऱ्या व्यक्तीने ऑफिसमध्ये कोणाशीही कटू शब्दांत बोलणं टाळावं, अन्यथा वादासह नोकरीवरही परिणाम होऊ शकतो.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायातील भागीदार तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करू शकतात. व्यावसायिकांना आज जास्त आक्रमक होणं टाळावं लागेल आणि त्यांचं हित लक्षात घेऊन व्यावसायिक मानसिकतेने काम करावं लागेल.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्वास टाळावा, कारण अतिआत्मविश्वास आरोग्यासाठी हानिकारक आहे असं म्हणतात. सामाजिक आणि राजकीय पातळीवर विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य राहील. डोळ्यांच्या जळजळीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल.िि
वृषभ (Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - तुम्हाला आज नवीन नोकरीसाठी मेल येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कामासोबतच सहकाऱ्यांचं मनही जपावं लागेल.कामासंबंधी प्रवासाचे योग आहेत.
व्यवसाय (Business) - तुमच्या राशीत सर्वार्थ सिद्धी आणि शूल योग तयार झाल्याने व्यवसायात उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळतील, व्यवसायात आर्थिक लाभ होईल. व्यावसायिकाने उत्पादनांच्या मार्केटिंगकडेही लक्ष दिलं पाहिजे.
विद्यार्थी (Student) - कलाकार, खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली तरच यश मिळेल. तुम्ही तुमच्या प्रियकरात गुंतलेले दिसाल.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल.
मिथुन (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी कोणतं काम कसं करायचं हे कोणी तुमच्याकडून शिकलं पाहिजे. प्रवास करताना एखाद्या मनोरंजक व्यक्तीला भेटल्याने तुमचा प्रवासातला वेळ कसा जाईल हे समजणार नाही.
व्यवसाय (Business) - तुमची सकारात्मक विचारसरणी तुम्हाला व्यवसायात तसेच शेअर बाजारात मोठ्या उंचीवर नेईल. व्यावसायिकांना अधिक नफा मिळण्याची शक्यता दिसते.
विद्यार्थी (Student) - मुलांना अभ्यासात विशेष लक्ष द्यावं लागेल, आळसामुळे त्यांचा अभ्यासात रस कमी होऊ शकतो. परीक्षेची तारीख जवळ आल्याने स्पर्धा परीक्षेची तयार करणारे विद्यार्थी चिंतेत असतील आणि विचित्र कोंडीत सापडतील.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम करणं तुमच्यासाठी चांगलं राहील.
कर्क (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, सर्वार्थ सिद्धी, शूल योग तयार झाल्याने कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. तुमचा बॉस तुमच्यावर दया दाखवू शकतो, तुमचा पगार वाढण्याचीही शक्यता आहे.
व्यवसाय (Business) - तुम्ही तुमच्या स्मार्टनेसचा वापर करुन व्यवसायात सुरू असलेले वाद लवकरच सोडवाल. आज व्यावसायाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचं दिसेल.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, जर तुम्ही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला विशेषतः सावध राहण्याची गरज आहे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.
आरोग्य (Health) - आज तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घेतली पाहिजे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुगर पातळी वाढल्याने तुम्हाला काळजी वाटेल.
सिंह (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका, वाद घालून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. बेरोजगार व्यक्तीला नोकरी मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात स्पर्धा वाढल्यामुळे तुमच्या अडचणीही वाढतील. व्यावसायिकांनी सावध राहावं, तुमच्या जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकते.
विद्यार्थी (Student) - वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची चिंता वाटू शकते. आज वडील तुमच्यावर रागावतील. दुचाकी चालवणाऱ्या तरुणांनी संपूर्ण कागदपत्रं घेऊनच बाहेर पडावं, अन्यथा त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज पचनाच्या समस्यांमुळे तुम्हाला त्रास होईल. खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या.
कन्या (Virgo Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, नोकरी करणाऱ्या व्यक्तीला शारीरिक श्रमाऐवजी मानसिक श्रम करावे लागतील, काम सहज कसं करता येईल याकडे तुमचं लक्ष असेल. आज कामात समस्या निर्माण होतील, त्या बाजूला सारुन तुम्ही तुमचं काम पूर्ण कराल.
व्यवसाय (Business) - आज सर्वार्थ सिद्धी आणि शूल योग तयार झाल्यामुळे तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवसायात चांगला नफा मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला आहे, ग्राहकांची चलबिचल राहील. अशा परिस्थितीत, तुम्हाला थंड डोक्याने ग्राहकांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना त्यांच्या अथक परिश्रमामुळे परीक्षेत यश मिळेल. नवीन पिढीने अपयशामुळे हार मानू नये. त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करत राहावे, तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आरोग्याबाबत सावध राहा. तुम्हाला सौम्य ताप जाणवू शकतो.
तूळ रास (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कोणत्याच प्रकारचा ताण किंवा थकवा जाणवू देऊ नका. तुमची दिवसभरातील सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
आरोग्य (Health) - आज तुमचा ब्लड शुगर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी थोडं वर्कआऊट, योगा, मेडिटेशन करायला सुरुवात करा.
व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गातील लोकांना आज चांगला नफा मिळू शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
युवक (Youth) - जोडीदाराबरोबरचा तुमचा आजचा दिवस मस्त, मजेत आणि आनंदात जाणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमची कामं वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्हाला भरपूर वेळ लागू शकतो.
आरोग्य (Health) - तुमच्या वाढत्या वजनाला पाहून तुम्हाला सतत चिंता जाणवू शकते. यामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता.
व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायाची प्रगती काहीशी हळू असेल. पण यामुळे तुम्ही खचून जाऊ शकता. पण, मनात नकारात्मक भावना आणू नका.
कुटुंब (Family) - आज तुमच्या कुटुंबियांचा कल धार्मिकतेकडे वळेल. प्रवासाच्या यात्रेला देखील जाण्याची शक्यता आहे.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त मदत घ्याल. त्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो.
आरोग्य (Health) - आज तुम्ही कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट देणारं काम करू नये. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
प्रेमसंबंध (Relationship) - आज तुमचं मन एखाद्याच्या आठवणीत रमू शकतं. तुम्हाला रडू देखील येऊ शकतं.
कुटुंब (Family) - आज संध्याकाळी तुमच्या घरात पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं. अनपेक्षित शुभवार्ता तुम्हाला मिळू शकते.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतत जास्त मेहनत करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला सतत सांधेदुखी जाणवू शकते.
आरोग्य (Health) - आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतत चिंता, थकवा यांरखे त्रास तुम्हाला उद्बवू शकतात.
व्यवसाय (Business) - आज पूर्णपणे तुमचं तुमच्या कामावर लक्ष असेल. पैसे कसे कमावायचे हाच विचार तुम्ही कराल.
तरूण (Youth) - तरूण विद्यार्थ्यांचा ओढा नोकरीपेक्षा जास्त व्यवसायाकडे वळताना दिसेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
नोकरी (Job) - आज तुम्हाला ऑफिसमध्ये चांगला मान-सन्मान मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याची तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा, सर्दी, खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
तरूण (Youth) - स्पर्धा परीक्षेला बसलेले विद्यार्थी परीक्षेत चांगलं यश मिळवतील. तसेच चांगली नोकरीही करतील.
कुटुंब (Family) - आज दूरच्या नातेवाईकांडून तुम्हाला चांगली शुभवार्ता मिळू शकते.
मीन रास (Pisces Horoscope Today)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकाऱ्यांकडून चांगला आशीर्वाद मिळू शकतो.
आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका.
व्यवसाय (Business) - तुमचा व्यवासाय आहे त्यापेक्षा पुढे नेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहभाग मिळेल.
तरूण (Youth) - तरूणांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे वाहन चालवताना जास्त वेगाने गाडी चालवू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology : आज रवि योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींना पैसाच पैसा, बँक बॅलन्स वाढणार