मुंबई : सध्या सणासुदीच्या काळात सराफा बाजार फुललेला आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold And Silver Rate Today) वाढ होताना दिसत आहे. भविष्यातही ही वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


वर्षभरात सोन्याच्या दरात 34 टक्क्यांची तेजी


सोन्याच्या किमतीत दररोज वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात सोने आणि चांदीच्या दराचा आलेख चढाच राहिलेला आहे. सोन्याच्या दराने वर्षभरात साधारण 41 वेळा उच्चांक गाठला असून वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात तेजी


गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे तसेच देशातील सणासुदीच्या दिवसांमुळे सोन्याच्या किमतीत ही तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. सोबतच आखाती देशात चालू असलेल्या युद्धसदृश संघर्षामुळे सध्या काहीशी अस्थिरतेची स्थिती आहे. त्यामुळे भविष्यातही सोन्याची चाल अशीच राहणार का? हे भविष्यात समजू शकणार आहे. 


सोनं 82 हजारांच्या पुढे 


गेल्या काही दिवसांपासून सोन्याने 80 हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबरमध्ये वितरीत होणाऱ्या सोन्याचे दर गुरुवारी 13 रुपयांनी वाढून 78443 रुपयांपर्यंत गेले होते. दिवाळीच्या एक दिवस आधी दिल्लीत सोन्याचा दर एक हजार रुपयांनी वाढून सोनं 82 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला होता. अजूनही सोन्याची मागणी जास्तच वाढली आहे. 


भविष्यात सोनं 86 हजारांवर पोहोचणार? 


भविष्यात सोन्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते सोनं आगामी काळात प्रति तोळा 81 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतं. दीर्घकाळात सोन्याची किंमत ही 86 हजार प्रतितोळा एवढी वाढू शतके. म्हणजेच भविष्यात सोनं 90 हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.


अमेरिकेतही सोन्याचा भाव वाढणार 


अमेरिकेतही सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे. कॉमेक्सवर सोनं मध्यम अवधीत 2830 डॉलर्स प्रती औंस तर दीर्घकाळात 3000 डॉलर्स प्रती औसंपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची आणि भविष्यातील सोन्याची स्थिती पाहता सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.  


हेही वाचा :


महत्त्वाची बातमी! रेल्वे विभागाने तिकीट आरक्षणाच्या नियमात केला मोठा बदल, लाखो लोकांवर थेट परिणाम होणार


सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी, तब्बल 20 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री, तर 2500 कोटींच्या चांदीची विक्री


4 महिन्यांत 32 टक्के वाढ, 6 महिन्यांत मालामाल, दिग्गज गुंतवणूकदार 'या' कंपनीवर फिदा; नावावर तब्बल 13,00,000 शेअर्स!