मुंबई : शेअर बाजारात (Share Market) अशा काही कंपन्या असतात ज्या फारशा चर्चेत नसतात मात्र परताव्याच्या बाबतीत त्या अनेक कंपन्यांमध्ये सरस ठरतात. स्मॉलकॅप कंपनी डब्ल्यूपीआयएल लिमिटेड ही कंपनीदेखील अशीच आहे. या कंपनीने गेल्या काही दिवसांपासून आपल्या गुंतवणूकदारांत चांगलंच मालामाल केलं आहे. गुरुवारी हा शेअर मुंबई शेअर बाजारावर 10 टक्क्यांपेक्षा अधिक उसळळा आहे. 


दोन दिवसांत 25 टक्क्यांनी वाढ


 डब्ल्यूपीआयएल (WPIL) हा शेअर गुरुवारी बीएसईवर थेट 10 टक्क्यांनी वाढला. गुरुवारी दिवसभरात हा शेअर 550.50 रुपयांवर पोहोचला. हे मूल्य या कंपनीच्या 52 आठवड्यातील सर्वाधिक मूल्य आहे. गेल्या दोन दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. या कंपनीने नुकतेच आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या कंपनीत दिग्गज गुंतवणूकदार मुकुल महावीर अग्रवाल यांनीदेखील गुंतवणूक केलेली आहे. 


शेअर 4 दिवसांत 32 टक्के वाढला  


डब्ल्यूपीआयएल लिमिटेड (WPIL Limited) या कंपनीचा शेअर गेल्या चार दिवसांत साधारण 32 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीचा शेअर 28 ऑक्टोबर 2024 रोजी 405.10 रुपये होता. हाच शेअर 31 ऑक्टोबर 2024 रोजी 535.95 रुपयांवर बंद झाला. गेल्या दहा महिन्यात या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये साधारण 76 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. या कंपनीच्या शेअरचे 52 आठवड्यांतील सर्वाधिक मूल्य 550.50 रुपये आहे. तर 52 आठवड्यातील नीचांकी मूल्य 298.78 रुपये आहे. 


63 टक्क्यांनी वाढला कंपनीचा नफा


डब्ल्यूपीआयएल लिमिटेड (WPIL Limited) या कंपनीचा सितंबर 2024 या तिमाहीत निव्वळ नफा  63.6 टक्क्यांनी वाढून 70.22 कोटी रुपये झाला. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा नफा 40.81 कोटी रुपये होता. चालू वित्त वर्षात सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 54 टक्क्यांनी वाढून 490.89 कोटी रुपये झाला आहे. याच कालावधित हा महसूल गेल्या वर्षी 318.74 कोटी रुपये होता. सध्या या कंपनीकडे 3665 कोटी रुपयांचा ऑर्डर्स बुक आहेत.


मुकुल अग्रवाल यांच्याकडे 13 लाख शेअर्स 


दिग्गज इनवेस्टर मुकुल महावीर अग्रवाल यांनीदेखील डब्ल्यूपीआयएल लिमिटेड (WPIL Limited) या कंपनीत मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे तब्बल 13,00,000 शेअर्स आहेत. कंपनीत त्यांची हिस्सेदारी 1.33 टक्के आहे. शेअहोल्डिंगचा हा डेटा सप्टेंबर 2024 तिमाहीपर्यंतचा आहे. कोटक इन्फ्रआस्ट्रक्चर अंड इकनॉमिक फंडजवळही या कंपनीचे एकूण 23,70,200 शेअर्स आहेत. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


Gold And Silver Rate Today : सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! जाणून घ्या लक्ष्मीपूजनदिनी दागिने किती रुपयांना मिळणार?


एसआयपी करताय? मग 'या' पाच चुका कधीच करून नका; नाहीतर होईल मोठा तोटा!


महत्त्वाची बातमी! रेल्वे विभागाने तिकीट आरक्षणाच्या नियमात केला मोठा बदल, लाखो लोकांवर थेट परिणाम होणार