Gold Price News : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात ( Gold Price) वाढ होत आहे. काही केल्या सोन्याचे दर कमी व्हायला तयार नाहीत. सध्या सोन्याच्या दरानं विक्रमी पातळी गाठली आहे. सोने (Gold) 70000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. त्यामुळं सोनं घेणं सर्वसमान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येत आहे. सोन्याबरोबर दुसरीकडे चांदीच्या दरातही (Silver Price) वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जाणून घेऊयात सोन्याच्या दराबद्दल सविस्तर माहिती.
सध्या बाजारात सोन्याच्या तेजीचा कल कायम आहे. दरात मोठी वाढ झाल्यानं खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. काही केल्या सोन्याचे दर कमी होत नाहीत. सोनं सातत्यानं नवीन विक्रम करत आहे. आज सोन्याचे दर हे 70 हजार रुपये झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार MCX वर सोन्याचे दर हे 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत.
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं पोहोचलं 69000
दरम्यान, 1 एप्रिलपासून नवीन 2024-25 हे आर्थिक वर्ष सुरु झालं आहे. या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याने नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे. या दिवशी सोन्यानं 69000 रुपयांची पातळी गाठली. त्या तुलनेत आज सोन्याचा दर हा 70000 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ
एकीकडे दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडं चांदीच्या दरातही वाढ होत आहे. MCX वर चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. MCX वर चांदीच्या दरात 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. MCX वर सध्या चांदीची किंमत ही 77,962 रुपये प्रति किलो झाली आहे.
जागतिक बाजारातही सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ
देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असतानाच जागतिक बाजारातही सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षीत मानली जाते. त्यामुळं सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरत आहे. त्यामुळं अनेक लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत. सध्या ज्या प्रमाणात सोन्याचे दर वाढत आहेत, त्याच प्रमाणत दर वाढत राहिले तर सोनं लवकरच 75 हजार रुपये 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता देखील वर्तवली जातेय.
महत्वाच्या बातम्या: