Astrology Today 3 April 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज बुधवार, 3 एप्रिल रोजी चंद्र मकर राशीत प्रवेश करणार आहे, तर शुक्र मीन राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे. मालव्य राजयोग हा पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी मालव्य राजयोगासोबत सिद्ध योग, शिव योग आणि उत्तराषाद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज मेष राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि जी कामं पूर्ण होण्यात अडथळे येत होते तीही पूर्ण होतील. नोकरदार लोकांना आज कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला त्यात यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळत राहील. आज तुम्ही घरी पूजेचं वैगरे आयोजन करू शकता. नवविवाहितांना आज चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. आज व्यापाऱ्यांना मोठी डील मिळेल, ज्यामुळे व्यापारी चांगला नफा कमावतील.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आज कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगलं यश मिळवता येईल. तुम्ही नवीन घर किंवा गाडी खरेदी करू शकता. तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. पांडुरंगाच्या कृपेने तुमची सर्व संकटं टळतील, आज तुमचं मन भक्तिभावात व्यस्त राहील. तुम्ही व्यवसायात काही नवीन उपकरणं खरेदी कराल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळेल. तुमचे भावंडांसोबत वाद झाले असतील तर आज त्यांच्याशी बोलून तुम्ही ते सोडवाल. वैवाहिक जीवन आनंदी असेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ ठरेल. सिंह राशीच्या लोकांना आज सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयी अनुभवता येतील. आज सकाळी तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही सर्व निर्णय सहज घेऊ शकाल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुम्ही प्रत्येक काम करू शकाल. जे स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवतात त्यांना आज चांगला नफा मिळण्याची शक्यता असते. नोकरदार आणि व्यावसायिकांना आपापल्या क्षेत्रात चांगलं यश मिळेल आणि कामाच्या तणावातूनही मुक्ती मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना आज पूर्ण होतील आणि भविष्यासाठी तुम्ही केलेल्या योजनाही यशस्वी होतील. तरुणांना आज कोणी खास व्यक्ती भेटू शकते, ज्यासोबत आयुष्य घालवण्याचा ते विचार करू शकतात. आज तुमच्या सभोवतालचं वातावरण प्रसन्न असेल आणि तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. तुम्ही नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तेही पूर्ण होऊ शकतं. तुमचं एखादं अडकलेलं सरकारी काम आज पूर्ण होऊ शकतं. नोकरी करणाऱ्यांना आज एखाद्या मोठ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. कुंभ राशीचे लोक आज काही प्रतिष्ठित आणि थोर व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित करण्यात यशस्वी होतील, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना मोठी ऑर्डर मिळाल्यास त्यांच्या आनंदाला मर्यादा उरणार नाही. तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम अडकलं असेल तर ते आज पांडुरंगाच्या कृपेने पूर्ण होऊ शकतं. व्यावसायिक आज संपूर्ण दिवस व्यस्त राहतील, आज व्यवसायात चांगला आर्थिक नफा मिळेल. मित्रांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि त्यांच्या मदतीने तुम्हाला अनेक कामं पूर्ण करण्याची हिंमत मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: