Sugar Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात सातत्यानं वाढ (sugar prices rising) होत आहे. त्यामुळं जागतिक स्तरावर अन्नधान्याची महागाई वाढण्याचा धोका अधिक तीव्र झाला आहे. सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र, महागाईमुळे लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. विशेषत: खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळं लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, साखरेच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं अन्न पदार्थांच्या किंमतीत वाढ होत आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किंमती गेल्या 13 वर्षातील सर्वोच्च आहेत. त्यामुळं देशांतर्गत बाजारावरही दबाव येत आहे.


साखरेचे दर वाढण्याचे कारण काय?


फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या ताज्या अहवालानुसार, जागतिक बाजारात साखरेच्या किंमती (sugar prices) सप्टेंबर महिन्यात उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. सध्या साखरेला जवळपास 13 वर्षांतील उच्चांकी दर आहेत. F&O च्या मते, जागतिक स्तरावर साखरेच्या किमती वाढवण्यात भारताचाही हातभार आहे. एल निनोमुळे भारत आणि थायलंडमधील ऊस पिकांवर परिणाम झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम साखरेच्या दरावर दिसून येत आहे.


साखर किंमत निर्देशांक 9.8 टक्क्यांनी वाढला


संयुक्त राष्ट्रांच्या कृषी एजन्सीने सांगितले की, सप्टेंबर महिन्यात एकूणच अन्नधान्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. मात्र, इतरांपेक्षा साखरेचे दर वाढले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात F&O साखर किंमत निर्देशांक 9.8 टक्क्यांनी वाढला आहे. आता निर्देशांक नोव्हेंबर 2010 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. F&O च्या साखर किंमत निर्देशांकात सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात विक्रमी वाढ होण्यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही या निर्देशांकात वाढ झाली होती. एजन्सीचे म्हणणे आहे की एल निनोमुळे ऊस उत्पादनाची स्थिती बिघडली आहे. ऊस उत्पादनावर परिणाम झाल्यास त्याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर होणार आहे. या भीतीने साखरेचे भाव वाढले आहेत. यातून दिलासा मिळण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.


भारत आणि थायलंड प्रमुख साखर उत्पादक देश


जागतिक स्तरावर भारत आणि थायलंड हे दोन्ही देश प्रमुख साखर उत्पादक आहेत. यंदा दोन्ही देशांतील ऊस पिकाला एल निनोचा फटका बसला आहे. एल निनोमुळं पावसाचं प्रमाण कमी राहिलं आहे. त्याचा परिणाम ऊसाचं उत्पादन घटलंआहे. यामुळं साखरेचं उत्पादन कमी होणार असून किंमती वाढत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Sugar Export Ban: सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालणार? नेमका का आणि कधी घेणार निर्णय; वाचा सविस्तर